तरुणाईमध्ये बेल बॉटम्सची क्रेझ

सुस्मिता वडतिले
Wednesday, 4 September 2019
  • अनेक दिवस बेल बॉटम पॅट्‌सचा जो काही फॅशन ट्रेंड सुरू झाला तो थक्क करणारा दिसून येतोय.

साधारण ७० ते ८०च्या दशकातील बॉलिवूडकरांना आणि त्यावेळच्या तरुणाईस बेल बॉटम्सच्या स्टाइलने सॉलिड वेड लावले होते. पायघोळ पायाशी घेर असणाऱ्या बेल बॉटम्सची स्टाइल आता परत आली आहे. 

बॉलिवूडने जीन्समध्ये बेल बॉटम्स हा प्रकार आपल्यासमोर आणला. मग त्यानंतर अनेक दिवस बेल बॉटम पॅट्‌सचा जो काही फॅशन ट्रेंड सुरू झाला तो थक्क करणारा दिसून येतोय. त्याकाळी जवळपास सर्वजण बेल बॉटम पॅट्‌स घालायचे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत ही बेल बॉटमची थोड्याअधिक फरकाने फॅशन मार्केटमध्ये दिसत होतीच.

पण ती आताच्या काळातही आणखी नव्या रंगात आणि नव्या ढंगात पुन्हा एकदा अवतरली आहे. कॉलेज युवतीमध्ये बेल बॉटम्सचा ॲक्‍शन रिप्ले सुरू झाला आहे. जम्पसूटस, डंग्रीज किंवा मग आता जुनीच फॅशन बेल बॉटम्सची नव्याने बाजारात अवतरली आहे. वेगवेगळ्या पिक्‍चरमध्ये तसेच टीव्ही शो, ॲवॉर्डस तसेच पार्टी वेअरसाठी हिरोईन बेल बॉटम्स वापरत आहेत. तीच फॅशन कॉलेज युवतीही फॉलो करीत आहेत.

 

जुनी फॅशन नव्याने अवतरली आहे. अगदी पूर्वीचे बॉलिवूड बेल बॉटम्स वापरायचे. तीच फॅशन यंदा भाव खात आहे. कॉलेज युवतींना बेल बॉटम्सने वेड लावले असून एक वेगळा हटके लूक दिसत असल्याने त्याला जास्त मागणी आहे. एखादी फॅशन बाजारात दाखल झाली की लगेच युवती खरेदी करण्यासाठी तिकडे धाव घेतात. 
- नम्रता थोरात, विद्यार्थिनी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News