पुण्यात महिला चित्रपट महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 9 March 2019

पुणे : 'तिच्या नजरेतून सिनेमा' ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चित्रपट पाहाण्याची संधी 10 मार्च पर्यंत पुणेकर रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट या महोत्सवात असणार आहेत. 

महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आशय फिल्म क्‍लब आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित महिला चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट दिग्दर्शिका अंजली मेनन आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

आजपासून सुरु झालेला हा महोत्सव येत्या 10 मार्च पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहलयात होणार आहे. पुणे व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. एनएफएआय हे चित्रपटाच्या मंदिरासारखेच असून याच ठिकाणी मी दिग्दर्शक होण्याचा निश्‍चय केला अशी आठवण मेनन यांनी सांगितली. तर मनोरंजनाचे माध्यम असलेल्या चित्रपटाने आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा अशी अपेक्षा गीतांजली यांनी व्यक्त केली.

यात इजिप्त, बांग्लादेश, फ्रान्स, श्रीलंका, तजाकिस्तान या देशातील चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवासाठी एकूण आठ चित्रपट आणि पाच लघुपटांची निवड करण्यात आली आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News