या राज्यात ९ तारखेला बीएडची प्रवेश परिक्षा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना शक्य असेल ते परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी लखनऊ विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. 

या राज्यात ९ तारखेला बीएडची प्रवेश परिक्षा 

उत्तरप्रदेशातील लखनऊ विद्यापीठाकडून बीएडची संयुक्त परीक्षा ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी ४ लाख ३१ हजार ९०४ विद्यार्थी परीक्षा देतील. लखनऊ विद्यापीठाकडून बीएड प्रवेशासाठी परीक्षेचं संयुक्त आयोजन करण्यात येतं. परीक्षा १६ विद्यापीठांकडून एकत्र राबिविली जाते. राज्यातील ७३ जिल्ह्यात १९ केंद्रे तयार करण्यात आल्याचे राज्य परीक्षा समन्वयक प्रोफेसर अमिता बाजपेयी यांनी सांगितले. यावर्षी कोणतीही खासगी शाळा किंवा महाविद्यालयात केंद्र तयार करण्यात आलेलं नाही. 

बीएड प्रवेशासाठी दोन पेपर घेतले जातील, पहिल्या पेपरमध्ये जनरल नॉलेज आणि हिंदी भाषा या विषयावर प्रश्न असतील त्याचबरोबर दोन्ही पेपरमध्ये ५० प्रश्न विचारले जातील. दुसरा पेपर सुध्दा दोन विभागांमध्ये असेल. सामान्य योग्यता चाचणी आणि (कला / विज्ञान / वाणिज्य / कृषी) या विषयावर दोन विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. तसेच दोन्ही विभागात ५० प्रश्न असतील. 

परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवाराला ऑनलाइन जागावाटपासाठी समुपदेशन करावं लागेल. सुरूवातीला ही परीक्षा एप्रिलमध्ये घ्यायची ठरली होती. पण कोरोनाच्या संसर्गामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली. 

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना शक्य असेल ते परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी लखनऊ विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News