स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे आवाहानात्मक आवाहानात्मक - तहसीलदारांचे मत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

पाली : जे. एन. पालीवाला महाविद्यालयात यावर्षी सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून येत्या काळात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजू होतील, असा विश्वास व्यक्त करत पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग अत्यंत खडतर  असल्याचे मत व्यक्त केले. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शेठ पालीवाला महाविद्यालयातील पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

सुधागडसारख्या आदिवासीबहुल तालुक्‍यातील ग्रामीण व शहरी भागातील मुलांना पदवी व पदव्युत्तरपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्याची संधी संस्थेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांनी निर्माण केली. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल यांनी महाविद्यालयात नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सु.ए.सो. अंतर्गत असलेल्या शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यार्थी जीवनात अनेक पदव्या प्राप्त करत असताना आदर्श व सुसंस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच चरित्र जतन करणे अति महत्त्वाचे आहे.

या कार्यक्रमाला पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, प्राचार्य युवराज महाजन, उपप्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक, प्रा. एम. एस. लिमन, प्रा. डॉ. एस. व्ही. पाथरकर, प्रा. डॉ. अंजली पुराणिक, प्रा. आर. एस. गीते, प्रा. उमेश इनामदार, प्रा. एस. ए. पाटील, प्रा. वाय. व्ही. भांडकोळी, प्रा. एन. एन. पाटील, डॉ. एम. ए. बडगुजर व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजित खरोसे यांनी केले. तर आभार प्रा. स्नेहल बेलवलकर यांनी मानले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News