यामुळे जगभरातील रसिक घेतील वाचनाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 28 February 2019

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुनीलकुमार लवटे यांनी विकिमिडिया कॉमन्स या मुक्त ज्ञानस्रोतात आपली एकूण 21 पुस्तके प्रताधिकारमुक्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आता जगभरातील वाचक ही पुस्तके कधीही कोणत्याही साधनाचा वापर करून वाचू शकतील. डाऊनलोड करून पाठवू शकतील.

कोल्हापूर : पुढच्या टप्प्यात ही पुस्तके विकिस्रोत या मुक्त ग्रंथालयात युनिकोड रुपासह समाविष्ट होतील. जेणेकरून ही सर्व पुस्तके इंटरनेटवर सर्चेबल होतील. विकिपीडियामधील लेखांना तसेच इतर प्रकारच्या लेखनाला विविध विषयावरचे हे साहित्य संदर्भासाठी उपलब्ध झाले आहे.

भविष्यातील ज्ञानाच्या स्वरुपाची गरज लक्षात घेवून लवटे सरांनी दूरदृष्टीचा परिचय देत इतर लेखकांना प्रेरणा दिली आहे. यापूर्वी जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, इरावती कर्वे, माधव गाडगीळ यांनीही आपली काही पुस्तके मुक्त करून दिली आहेत. या दानामुळे आज विकिमिडिया कॉमन्सवरील मराठी पुस्तकांच्या संख्येचे शतक ओलांडण्याचा विक्रमही झाला आहे.

या दानामुळे विशेषत: त्यातील वाचनीय पुस्तकांमुळे जगातील ज्ञानस्रोतात प्रथमच वाचनशास्त्र या पुस्तकाची नवीन श्रेणी नोंदविली गेली आहे. या उपक्रमात इंटरनेटवर मराठीतून ज्ञान वाढण्यासाठी प्रयत्न करणारे सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News