चक्क "या" दोन माशांमुळे मच्छिमार झाला लखपती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 January 2020
  • आज बाजारात दुर्मिळ माशांची मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यासाठी मोठी किंमत दिली जाते.
  • या मच्छिमाराने हे मासे १०-१० लाख किमतीने विकले आणि एका रात्रीत त्याचे नशीब फळफळले आहे. 

समुद्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करणे, हे मच्छिमारांचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असते. अनेकदा मच्छिमारांच्या जाळयात दुर्मिळ मासे अडकतात. त्यातून त्यांना मोठा लाभ होतो. अशीच घटना पाकिस्तानमधील एका मच्छिमारासोबत घडली आहे.  कराची येथील एक मच्छिमार अरबी समुद्रात मच्छिमारी करत असताना त्याच्या जाळ्यात दोन दुर्मिळ मासे अडकले, आणि मच्छिमारांचे नशीब उजळले. 

आज बाजारात दुर्मिळ माशांची मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यासाठी मोठी किंमत दिली जाते. या मच्छिमाराने हे मासे १०-१० लाख किमतीने विकले आणि एका रात्रीत त्याचे नशीब फळफळले आहे. 

पर्यावरणासाठी काम वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड या संस्थेच्या माहितीनुसार, या माशाचे वजन साधारणतः ३० ते ४० किलो असते. याचा आकार दीड ते दोन मीटर एवढा असतो. प्रत्येक देशात विविध नावाने हे मासे ओळखले जातात.
 
या माशांपासून औषधनिर्मिती आणि तेल निर्मिती होत असल्याने औषध कंपन्यांकडून या माशांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे या माशाला असणारे ब्लेडर. या माशांमध्ये एअर ब्लेडर असते, त्याला मोठी मागणी असते. या प्रजातीचे मासे बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात अधिक आढळतात. त्यामुळे ते दुर्मिळ असून देशभरात त्याची मागणी असते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News