या कारणामुळे शिक्षकाने विद्यार्थीनीच्या पाण्यात घातले विष...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

कोल्हापूर - येथील शिरोळ तालुक्यातील शिरटी गावात सानिका नामदेव माळी या विद्यार्थ्यांनीला पाण्यातून शिक्षकाने विष दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकाचं नाव निलेश बाळू प्रधाने असं असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. शिक्षकाने विष पाजल्याचे कबुली पोलिसांना दिली असून पोलिस शिक्षकाचा अधिक तपास करत आहे. 

मयत सानिका आणि शिक्षक प्रधाने यांच्यात काही दिवसांपासून चांगले संबंध होते. परंतु शिक्षकाने सानिकाला विष का पाजले याबाबत ग्रामस्त संभ्रमात  आहेत. पण हे प्रकरण उघडकीस आल्याने अख्ख्या शिरोळ तालुक्यात खळबळ माजली आहे. पोलिस चौकशी करत असताना विषाची बाटली कोणत्या दुकानातून घेतली, तसेच केव्हा विष पाजले याची माहिती पोलिसांनी मिळवली आहे. 

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे...

पाण्यातून विषबाधा झाल्याने मयत विद्यार्थींनी कित्येक दिवसांपासून रूग्णालयात होती. मंगळवारी सानिकाने अखेरचा श्र्वास घेतला. सानिका दहावीच्या वर्गात शिकत होती. २० फेब्रुवारीला पाण्यातून विषबाधा झाल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आहे होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News