'हेल्थ बॅण्ड'मुळे प्रियकर नको त्या अवस्थेत सापडला.. 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 December 2019

'हेल्थ बॅण्ड' आरोग्याशी निगडीत असल्यामुळे अनेकजण वापर करताना दिसतात. मात्र, 'हेल्थ बॅण्ड'मुळे प्रियकर दुसऱया मुलीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडला गेल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील महिला पत्रकाराच्या बाबतीत ही घटना घडली आहे.

न्यूयॉर्क: प्रियकरावर जीवापेक्षा जास्त प्रेम करत होते. प्रियकराने मला एक भेटवस्तू दिली होती. पण, या भेटवस्तूमुळेच तो रंगेहाथ पकडला गेला आणि मला फसवत असल्याचे समोर आले. एका प्रेसयीने ट्विट करून आपली व्यथा मांडली आहे.

अमेरिकेतील क्रीडा पत्रकार असणाऱ्या जेनी सॅल्टर (वय 38) हिने स्वत:च हा अनुभव ट्विटवरुन शेअर केला आहे. तिने म्हटले आहे की, 'माझ्या प्रियकराने एकदा मला नाताळानिमित्त फिटबीट भेट म्हणून दिले होते. मला ते खूप आवडलं. व्यायाम करण्याबरोबरच एकमेकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही ते एकमेकांच्या डिव्हाइसशी सिंक्रो करुन घेतले होते.

 

मात्र, अचानक एका रात्री पहाटे चारच्या सुमारास माझ्या प्रियकराची शारीरिक हलचाल वाढल्याचे नोटीफिकेशन माझ्या मोबाईलवर आले. प्रियकराचे एवढी शारीरिक हालचाल वाढल्यामुळे मला काळजी वाटली. पण, खरी परिस्थिती जाणून घेतली तेंव्हा मोठा धक्का बसला. माझा प्रियकर दुसऱ्या  मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याची खरी माहिती समजली. माझा प्रियकर मला फसवत होता पण या 'हेल्थ बॅण्ड'मुळे खरी माहिती पुढे आली.'

जेनीने ट्विट करून आपली व्यथा जगासमोर मांडल्यानंतर 46 हजारांहून अधिक लोकांनी ट्विट लाईक केले आहे तर 4.72 लाखांहून अधिक जणांनी ट्विटला लाईक केले आहे. जेनी ट्विटमुळे चर्चेत आली आहे. तिच्या ट्विटवरही अनेकांनी वेगवेगळ्या अनुभवांचे रिप्लाय दिले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News