...या करणामुळे डोनाल्ड ट्रम्प पॉर्न स्टारला देणार लाखों रुपये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • निवडणुका या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या असतात. पण अमेरिकेत नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या निवडणूकीची डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
  • अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत.

वॉशिंग्टन :- निवडणुका या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या असतात. पण अमेरिकेत नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या निवडणूकीची डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. यासाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या प्रेम प्रकरणांची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ट्रम्प यांना एका पॉर्न स्टारला सुमारे ३३ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रम्प यांच्यासोबत कथित प्रेम प्रकरणानंतर शांत राहण्यासाठी पैसे देण्यात आले असल्याचे पॉर्न स्टारचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या एका कोर्टाने राष्ट्राध्यक्ष  ट्रम्प यांना ३३ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 

पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्सने २००६  मध्ये ट्रम्प यांच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. परंतु ट्रम्प यांनी याचे स्पष्टपणे खंडन केले आहे. ४१ वर्षीय स्टॉर्मी डेनियल्सने ट्रम्पवर न्यायालयीन खटला केला होता. नंतर हे प्रकरण रद्द करण्यात आले. पण त्यानंतर कॅलिफोर्नियातील कोर्टाने ट्रम्प यांना डॅनियल्सने खटल्यादरम्यान खर्च केलेले सर्व पैसे ट्रम्प यांना द्वावे लागणार असल्याचे सांगत ३३ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. स्टॉर्मी डॅनियल्सने कोर्टाच्या या निर्णयानंतर ट्विटही केले आहे. 

 

 

यापूर्वी ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केल्यानंतर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने एक पुस्तकही लिहिले होते, ज्यात ट्रम्प यांच्याशी असलेल्या त्याच्या प्रेमसंबंधांबद्दल खुलेपणाने भाष्य केले होते. या पुस्तकाची खूप चर्चादेखील झाली होती.

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News