पावसाळ्यात चेहरा चिकट होतो? मग हे उपाय करा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

पावसाळ्यात सतत वातावरण बदल होत असल्यामुळे त्वचेवर त्याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची जास्त काळजीघेणे गरजेचे असते.

पावसाळ्यात सतत वातावरण बदल होत असल्यामुळे त्वचेवर त्याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची जास्त काळजीघेणे गरजेचे असते. आम्ही आपल्याला घरगुती फेसपॅकची माहिती सांगणार आहोत. कोणत्याही खर्चाशिवाय घरी तो आरामात हे फेसपॅक बनवू शकता. 

१) बेसन, मध आणि ग्रीन टी

या फेसपॅक तयार करण्यासाठी १ चमचा बेसनासोबत १ मोठा चमचा मध आणि थोडीशी ग्रीन टी मिसळा. हे एकत्रित मिसळून चेहऱ्यावर २० ते ३० मिनिटांपर्यंत लावून ठेवा आणि त्यानंतर धुवून टाका. या फेसपॅकमुळे त्वचेला पोषण मिळते. 

२) काकडी, गुलाब पाणी आणि ग्रीन टी

तुम्हांला चेहऱ्यावर ताजेपणा हवा असल्यास हा पॅक तयार करण्यासाठी गुलाब पाणी, काकडीचा रस आणि ग्री टी मिसळा. हा पॅक लावल्याने चेहऱ्याला आराम मिळतो. तसेच जळजळणे आणि खाजेपासून देखील सुटका होते. 

३) बटाटा, लिंबू आणि गुलाब पाणी 

पावसाळ्यात मुरुमांच्या भरपूर समस्या उद्भवतात. यात आपण बटाटाच्या रसात २ छोटे चमचे लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळा. हा पॅक ३० मिनिटांपर्यंत लावा आणि मग पाण्याने धुवून टाका. 

४) डाळींबाचे दाणे, मध आणि ताक 

पावसाळ्यात त्वचा खूप ड्राय होते. त्यासाठी २ चमचे डाळींबाचे दाणे, २ चमचे मध आणि थोडासं ताक मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News