लग्नाआधी हे काम जरुर करा...आयुष्यभर रहाल खुश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

नात्यांमध्ये स्थिरता कमी होत चालली आहे. यामुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्याऐवजी भांडणे करू लागतात. या भांडणाचा शेवट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. नात्यामध्ये पारदर्शकता आणि विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे असते. लग्न हा आयुष्यातील असा टर्निंग पॉईंट असतो, ज्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. सध्याच्या काळात अधिकाधिक लग्न करणारी तरूण मंडळी लग्नाआधी काऊन्सिलिंग करण्यावर भर देतात. मॅरेज काऊन्सिलिंग करणे हे गरजेचे बनले आहे. 

मुंबई : नात्यांमध्ये स्थिरता कमी होत चालली आहे. यामुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्याऐवजी भांडणे करू लागतात. या भांडणाचा शेवट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. नात्यामध्ये पारदर्शकता आणि विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे असते. लग्न हा आयुष्यातील असा टर्निंग पॉईंट असतो, ज्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. सध्याच्या काळात अधिकाधिक लग्न करणारी तरूण मंडळी लग्नाआधी काऊन्सिलिंग करण्यावर भर देतात. मॅरेज काऊन्सिलिंग करणे हे गरजेचे बनले आहे. 

मॅरेज काऊन्सलरकडे जाणे वेळेचा अपव्यय आहे, मात्र नुकत्याच हाती आलेल्या सर्व्हेनुसार ७५ टक्के जोडपी लग्नाआधी काऊन्सिलिंगला पसंती देत असल्याचे समोर आले  आहे. 

नात्यात मोकळेपणा येतो
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात एकमेकांशी बोलायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि तणावामुळे एकमेकांच्या समस्या समजून घेण्यासाठी वेळही नसतो. अशा काही जोड्या असतात ज्या सुरूवातीला एकमेकांशी बोलण्यास तसेच काही शेअर करण्यास कचरतात. यामुळे नात्यात पुरेसा मोकळेपणा येत नाही. लग्नाआधी योग्य प्रकारे काऊन्सिलिंग केले तर दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात.

जबाबदारी निभावणे
लग्नानंतर अनेकदा असे होते. एकमेकांवर चुका ढकलल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे कोणीही एकमेकांची जबाबदारी घेण्यास तयार नसतात. यामुळे लग्नानंतरची जबाबदारी समजण्यासाठी तसेच योग्य पद्धतीने ती निभावण्यासाठी मॅरेज काऊन्सिलिंग महत्त्वाचे ठरते. 

विचारांमध्ये बदल होतात
लग्न हा आयुष्यातील असा टर्निंग पॉईंट असतो, ज्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. यासोबतच तुमच्या विचारांमध्येही बदल होतात. अनेकदा भीती तसेच घाबरल्यामुळे तुमच्या मनात शंकाचे काहूर माजू शकते. यावेळी योग्य दृष्टिकोन असणे महत्त्वाचे असते. 

एकमेकांना समजून घेणे गरजेचे
लग्नाआधी काऊन्सिलिंग केल्यास ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला आयुष्य काढायचे आहे त्याला समजून घेणे सोपे जाते. दोन्ही व्यक्ती भिन्न स्वभावाच्या असतात. लग्नानंतर एकमेकांना ओळखणे सुरू होते. यावेळी काऊन्सिलिंग केल्यास एकमेकांना समजून घेण्यास पुरेसा वेळ देता येतो. दोघांनाही ते सोपे जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News