'यशस्वी' व्हायचे असेल, तर 'आत्मविश्वास' असणे आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 January 2020

यशस्वी व्हायचे असेल, तर आत्मविश्वास आपल्याकडे असणे आवश्‍यक आहे. आत्मविश्वास हीच स्वयंप्रेरणा असून, यशस्वी होण्याची व विकासाची देखील गुरुकिल्ली आहे,

साक्री : शालेय जीवनात असो अथवा आपल्या दैनंदिन आयुष्यात असो, आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, तर आत्मविश्वास आपल्याकडे असणे आवश्‍यक आहे. आत्मविश्वास हीच स्वयंप्रेरणा असून, यशस्वी होण्याची व विकासाची देखील गुरुकिल्ली आहे, असे मत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी व्यक्त केले. 

बोधगाव येथे झालेल्या या शिबिरात विविध कार्यक्रम झाले. शिबिर काळात रासेयो धुळे जिल्हा समन्वयक डॉ. वाल्मीक आढावे यांचे ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘, डॉ. एस. सी. अहिरे यांचे ‘पाणी व्यवस्थापन‘, डॉ. के. डी. बागूल यांचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन‘, प्रा. सतीश अहिरे यांचे ‘स्पर्धा परीक्षा’, योगेश्वर आव्हाळे यांचे ‘आपत्ती व्यवस्थापन’, आर. एस. माळी यांचे ‘व्यसन मुक्त समाज’, डॉ .महेंद्र बोरसे यांचे ‘आहार आणि आरोग्य’, धनंजय लक्ष्मण सोनवणे यांचे ‘पर्यावरण व युवक’, धनंजय व्ही. सोनवणे यांचे ‘सोशल मीडिया’, डॉ. डी. एस. चव्हाण यांचे ‘सामाजिक उत्तरदायित्व’, प्रा. आय. यू. शेख यांचे ‘मोबाईल बॅंकिंग’, प्रा. श्‍याम वळवी यांचे ‘ग्रामीण विकास’, प्रा. डॉ. सुदाम राठोड यांचे ‘जातीमुक्त भारत’ या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
विभागीय समन्वयक डॉ. सचिन नांद्रे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. अहवालाचे वाचन डॉ. सुनील पाटील यांनी केले. पारितोषिक वितरण नियोजन डॉ. जगदीश पाटील यांनी केले. डॉ. एस. ए. पाटील यांनी आभार मानले.

दहिवेल येथील उत्तमराव पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रा. पाटील बोलत होते.  प्राचार्य डॉ. बी. डी. बोरसे अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. सुरेश अहिरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश अहिरे, दत्तकगाव बोधगाव येथील ग्रामसेवक विशाल अकलाडे, ज्येष्ठ ग्रामस्थ सीताराम पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पंडित बहिरम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News