पुण्यात क्वारंटाइन व्हा आणि परीक्षा घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020

प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका सॅनिटाइज केल्या जातील, त्याचबरोबर सर्व वर्ग  सॅनिटाइज केले जातील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनचं परीक्षा होतील असं कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे परीक्षेस दाखल होण्याआधी विद्यार्थ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधणकारक आहे.

पुण्यात क्वारंटाइन व्हा आणि परीक्षा घ्या

पिंपरी चिंचवड - कोरोनाच्या काळात लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी शासकीय आदेशानुसार शाळा, महाविद्यालये आणि कॉलेज वापरण्यात आली. या कारणामुळे महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयातील सर्वच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पण अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय अद्याप झालेला नसून तो न्यायप्रविष्ठ आहे. पण पुण्यात दंतवैद्यकीय कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दोन आठवडे क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. सध्या कॉलेजमध्ये १५० विद्यार्थी शिकत आअसून सप्टेंबर महिन्यात त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.

दंतवैद्यकीय कॉलेजमधील विद्यार्थींची परीक्षा आगोदर घेण्यात येणार होती. पण कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितले असून त्यांची परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे, असं विद्यार्थ्यांना कॉलेजकडून सांगण्यात आलं आहे.

अजूनही महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून पिंपरी चिंचवडमध्ये सुध्दा आता कोरोनाचे अधिक रूग्ण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार केल्यास परीक्षा घेणं योग्य नसल्याचं पालकांचं मतं आहे. भयानक परिस्थिती असतानाही कॉलेज प्रशासन परीक्षा घेत असल्याने आश्चर्य़ व्यक्त केले जात आहे.

प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका सॅनिटाइज केल्या जातील, त्याचबरोबर सर्व वर्ग  सॅनिटाइज केले जातील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनचं परीक्षा होतील असं कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे परीक्षेस दाखल होण्याआधी विद्यार्थ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधणकारक आहे.

सध्या पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाचे ३० हजारांच्या आसपास रूग्ण आहेत. तसेच ४८० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षा घेणे अधिक धोकादायक ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News