तरुणांनो सावधान! जंक फूड ठरतोय शरीराला घातक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 September 2019

शाळा कॉलेज मधील मुलांमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयी काळानुसार बदलतात. नवीन पदार्थ सेवन करण्यास तरुणाई ही आकर्षिली जाते.

आजच्या धावत्या जगात तरुण- तरुणी हे पोषक आहारापासून वंचित राहिलेले दिसतात. तसेच त्यांच्या जीवनात आजूबाजूला घडत असलेले बदल हे त्यांच्या राहणीमानावर परिणाम करताना दिसत आहेत. आताच्या तरुण मुलं- मुलींमध्ये हे बदल झपाट्याने होत आहेत, मुख्यत्त्वे शाळा कॉलेज मधील मुलांमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयी काळानुसार बदलतात. आताच्या नव नवीन पदार्थ सेवन करण्यास तरुणाई ही आकर्षिली जाते. मात्र त्याचा परिणाम हा त्यांच्या शरीरावर होतो. 

इग्लंडच्या एका सतरा वर्षाच्या मुलाला अचानक दिसेनासे झाले असून तो कर्णबधिर झाल्याची घटना समोर येत आहे. याचे कारण सातत्याने खाल्ले गेलेले जंक फूड.  मुलगा गेल्या दहा वर्षांपासून जंक फूड खात असल्याने त्याच्या शरीरातील काही अवयवांच्या संवेदना या निकामी झाल्या आहेत. या मुलाला एक वेगळ्याच प्रकारचा डिसऑर्डर आहे. ज्याचे नांव अव्हॉइडण्ट रीस्ट्रीक्टीव्ह फूड इनटेक डिसऑर्डर असे आहे. एकूणच त्या मुलाला  लहानपणापासुनच  फळ आणि  भाज्या खाण्याने त्रास होत असल्याने हे खाणे बंद केलं. त्यामुळे हा मुलगा फक्त जंक फूड वरच जगत होता. त्यात वेफर्स, व्हाईट ब्रेड, प्रोसेस्ट मांसाहारी पदार्थ याचा जास्त समावेश असल्याने त्याला या आजाराशी लढावं लागत आहे.
 
परिणामी पोषक आहार घेत नसल्याने तसेच निकृष्ठ दर्जाचे अन्न सेवन करण्याने असे अपंगत्व येऊ शकते. असे जंक फूड सातत्याने खाल्ल्याने जे आजार कुपोषित मुलांना असतात, तेच आजार हे आजच्या धावत्या जगातल्या तरुण- तरुणींना अल्प वयात होत आहेत. ह्या जंक फूड च्या सेवनाने शरीरात हळू हळू विविध व्हिटॅमिनच्या कमतरता निर्माण होतात. त्याचा परिणाम हा मेंदूकडे जाणाऱ्या नसांवर होते त्यामुळे डोळ्यांना आणि परिणामी संवेदनशील अवयवांना ह्याचा फटका बसतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News