उन्हाळ्यात रात्री आंघोळ करा; हे होतील फायदे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 May 2019
  • उन्हाचा उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
  • त्यासोबतच येणारे आजार देखील वाढले आहेत.
  • उन्हाचा कहर थांबवणं तर शक्य नाही; मात्र यातुन बाहेर कसं पडत येईल यासाठी काही टिप्स आहेत.

मुंबई :  उन्हाचा उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यासोबतच येणारे आजार देखील वाढले आहेत. उन्हाचा कहर थांबवणं तर शक्य नाही; मात्र यातुन बाहेर कसं पडत येईल यासाठी काही टिप्स आहेत. सकाळी अंघोळ केल्यावरही आलेल्या घामामुळे पुन्हा अंघोळ होते की काय अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे घामामुळे तवाच सतत ओली राहून शरीराला धूळ चिकटून वेगवेगळे त्वचेचे विकार वाढविण्याची शक्यता असते. शरीरावर मळ जमा तर होतो सोबतच शरीराची दुर्गंधीचे प्रमाण देखील वाढते. त्यामुळे तुम्ही रोज रात्री आंघोळ करत असाल तर त्वचेच्या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. 

ताजेतवाने वाटेल 
दिवसभराच्या प्रवास आणि घामामुळे थकलेले असताना रात्री अंघोळ केल्यास तुम्हाला नक्की फ्रेश वाटेल. त्यासोबतच तुमची त्वचा देखील तजेलदार दिसेल. 

रक्तप्रवाह सुरळीत राहील 
दिवसभरापेक्षा रात्रीच्या वेळी आपल्या शरिरातील रक्त प्रवाह शांत गतीने होत असतो. यावेळी आंघोळ केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल. याचा आपल्या हृद्यावरही चांगला परिणाम पाहायला मिळतो. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढेल 
उन्हाळ्यातील घामुळे आणि उष्णतेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. रात्री अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळेल. 

तणावरहित झोप मिळेल 
उन्हामुळे शरीर दमून आपल्यावर तणाव निर्माण होतो. रात्रीच्यावेळी अंघोळ केल्यास शरीरातील तणाव दूर होईल. त्यानंतर शांत आणि तणावरहित झोप मिळेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News