बार्सिलोना - बायर्नमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत होण्याची दाट शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

बार्सिलोना आणि बायर्न म्युनिच यांच्या चॅम्पियन्स लीगफुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीची लढत होण्याची दाट शक्‍यता आहे.अर्थात या दोन्ही संघांच्या उपउपांत्यपूर्व लढती अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

पॅरिस: बार्सिलोना आणि बायर्न म्युनिच यांच्या चॅम्पियन्स लीगफुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीची लढत होण्याची दाट शक्‍यता आहे.अर्थात या दोन्ही संघांच्या उपउपांत्यपूर्व लढती अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. बायर्नने चेल्सीविरुद्धची पहिल्या टप्प्याची लढत 3-0 जिंकली आहे, तर बार्सिलोनाने नापोलीतील लढत 1-1 बरोबरीत सोडवली आहे.

दरम्यान, मॅंचेस्टर सिटी आणि रेयाल माद्रिद यांच्यातील उपउपांत्य फेरीतील विजेता मिलान आणि युव्हेंटिस यांच्यातील सरस संघास आव्हान देणार आहे. माद्रिदमधील पहिल्या टप्प्याची लढत सिटीने 2-1 जिंकली होती, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा युव्हेंटिस लिऑनविरुद्ध 0-1 पराजित झाला होता. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती 7 आणि 8 ऑगस्टला होतील. त्यानंतर सर्व सामने थेट होत विजेता निश्‍चित होईल. चॅम्पियन्स लीगमध्ये उपांत्य फेरीपर्यंत होम अँड अवे पद्धतीने लढती होऊन दोन्ही सामन्याच्या एकत्रित निकालानुसार विजयी संघ ठरत असतो; पण कोरोना महामारीमुळे आलेल्या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News