board exam : बारावीच्या परिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने स्वतःच केलं...

यिनबझ टीम
Wednesday, 4 March 2020

आता तुम्हीच सांगा एखाद्या परिक्षेपासून वाचण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता? जास्तीत जास्त आजारी पडाल, मात्र हे केल्यानंतर तरी तुमची परिक्षेपासून सुटका होणार आहे का? झालीच तरी काय खात्री की ती परीक्षा तुम्हाला पुन्हा द्यावी लागणारी नाही?

आता तुम्हीच सांगा एखाद्या परिक्षेपासून वाचण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता? जास्तीत जास्त आजारी पडाल, मात्र हे केल्यानंतर तरी तुमची परिक्षेपासून सुटका होणार आहे का? झालीच तरी काय खात्री की ती परीक्षा तुम्हाला पुन्हा द्यावी लागणारी नाही?

आता असाच एक अयशस्वी प्रयत्न मध्य प्रदेशमधल्या मुरैना येथील जौरा गावातील रणवीर नावाच्या विद्यार्थ्याने केला आहे. हे महाशय सध्या बारावीची परीक्षा देत आहेत. मात्र बारावीच्या परीक्षा देण्यास लागू नये म्हणून या महाशयांनी चक्क आपल्या लहान भाच्याचेच अपहरण केलं . परंतू हे नाट्य जास्त काळ टिकून राहिलं नाही, पोलिसांनी जबरदस्तीने केलेल्या चौकशीमुळे अखेर त्याने रचलेला प्लॅन फसला.

संबंधीत गावातील नेमीचंद नावाची एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह एका घरगुती फंक्शनला गेला होता. मुलांना झोप लागली म्हणून त्यांनी तिथल्या पलंगावर दोघांनाही झोपवलं, या कार्यक्रमात नेमीचंद यांचा मेहुणा रणवीरदेखील आला होता.

योग्य संधी साधून त्याने तिथे झोपवलेल्या एका मुलाला म्हणजे आपल्या भाच्याचे  अपहरण केले आणि तिथे चिठ्ठी सोडली, ज्यावर लिहले होते, तुम्ही जर तुमच्या मुलाला परत पाहू इच्छित असाल, तर रणवीरला त्याच्या अभ्यासातून मुक्त करा, अखेर पोलिसांनी त्याला या सगळ्या प्रकरणातून समज देऊन सोडून दिले.

आता तुम्हीच सांगा, की या महाशयांनी केलेला हा सर्व प्रकार किती योग्य आहे?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News