तब्बल ९ कोटी पगार घेणाऱ्या तरुणाला दाखवला घरचा रस्ता 

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Wednesday, 5 February 2020
  • ब्रिटन मध्ये असलेल्या सर्वात मोठ्या क्रेडिट ट्रेडर्समध्ये त्यांचा नावाचा समावेश होता . सिटी बँकेत कार्यरत असण्यापूर्वी त्यांनी नामांकित अशा बँकेत आपल्या कामाचा ठसा देखील उमटविला होता.
  • मात्र या सर्व प्रकरणामुळे देव देतो आणि कर्म नेतो अशी चर्चाच दिवसभर बँकिंग वर्तुळात रंगत होती 

मुंबई : लंडन  येथील सिटी बँकेत कार्यरत असणाऱ्या भारतीय तरुणाची चर्चा ही सध्या बँकिंग विश्वात चांगलीच रंगलीय.वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी ९ कोटी रुपये एवढे गलेलठ्ठ मानधन घेणाऱ्या भारतीय तरुण पारस शाह हा सध्या चांगलाच गोत्यात आला आहे.

पारस शाह याने त्याच्या सिटी बँकेतील विभागीय कार्यालयातील कॅंटीनमध्ये सँडविच लंपास केल्यामुळे त्याला आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. ३१ वर्षीय भारतीय तरुण पारस शाह ह्याला सँडविच चोरल्यामुळे बँकेने थेट घरचा रास्ता दाखवलाय.

तसेच त्याचे ह्या सर्व प्रकरणामुळे तातडीने निलंबन करण्यात आले आहे . पारस शाह हा गेल्या काही काळापासून लंडन शहरातील सिटी बँकेच्या विभागीय मुख्यालयात बँकर ची जवाबदारी पार पाडत होता.त्याला भारतीय चलनात तब्बल ९ कोटी रुपये एवढे मानधन देखील मिळत होते. 

ब्रिटन मध्ये असलेल्या सर्वात मोठ्या क्रेडिट ट्रेडर्समध्ये त्यांचा नावाचा समावेश होता . सिटी बँकेत कार्यरत असण्यापूर्वी त्यांनी नामांकित अशा बँकेत आपल्या कामाचा ठसा देखील उमटविला होता.मात्र या सर्व प्रकरणामुळे देव देतो आणि कर्म नेतो अशी चर्चाच दिवसभर बँकिंग वर्तुळात रंगत होती 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News