बांगलादेशच खरा टायगर

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 3 June 2019

लंडन - बांगलादेशने विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचे सलामीचे प्रतिस्पर्धी असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ धावांचा डोंगरच उभारला नाही, तर द. आफ्रिकेच्या फलंदाजाना मोक्याच्यावेळी वर्चस्व घेण्यापासूनही रोखले.  या स्पर्धेत विजय मिळवणारा पहिला संघ होताना बांगलादेशने २१ धावांनी बाजी मारली. 

लंडन - बांगलादेशने विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचे सलामीचे प्रतिस्पर्धी असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ धावांचा डोंगरच उभारला नाही, तर द. आफ्रिकेच्या फलंदाजाना मोक्याच्यावेळी वर्चस्व घेण्यापासूनही रोखले.  या स्पर्धेत विजय मिळवणारा पहिला संघ होताना बांगलादेशने २१ धावांनी बाजी मारली. 

आफ्रिकेची गोलंदाजी सलग दुसऱ्या सामन्यात निष्प्रभ झाली आहे आणि त्याचा फायदा घेत बांगलादेशने वन-डे क्रिकेटमधील आपली सर्वाधिक धावसंख्या उभारली. तीनशेपेक्षा जास्त धावांचा पाठलाग लक्ष्याचा लक्ष्याचा पाठलाग करताना मोठी भागीदारी आवश्यक असते, पण एखादी भागी जमल्यावर त्याला वेग देण्याच्या प्रयत्नात आफ्रिकेच्या फलंदाजांनी विकेट बहाल केल्या. आफ्रिकेच्या पहिल्या पाच विकेटमध्ये जेमतेम एकच अर्धशतकी भागीदारी होती. बांगलाच्या अचूक गोलंदाजीमुळेच आफ्रिकेवरील  दडपण वाढतच गेले.

इंग्लंडविरुद्ध पराभवातून आफ्रिका सावरण्यापूर्वीच त्यांचा धोकादायक बांगलादेशविरुद्ध सामना झाला. निव्वळ धावगती उंचावण्यासाठी बांगलादेशला झटपट गुंडाळून झटपट लक्ष्य गाठण्याचा आफ्रिकेचा इरादा होता; प्रत्यक्षात बांगलादेशने संयमी आक्रमकता दाखवत सव्वातीनशेचा पल्ला पार केला. खराब चेंडूची प्रतीक्षा करीत त्यावर हल्ला चढवण्याची बांगलादेशची योजना यशस्वी ठरली. 

तामिम इक्‍बाल आणि सौम्याने रचलेल्या भक्कम पायावर मुशफिकर आणि शकीबने उंच इमारत उभारताना आफ्रिका गोलंदाजांचे मनोधैर्य  खच्ची केले. त्यांच्या १४२ धावांच्या भागीने जणू बांगलास रोखण्याच्या आफ्रिकेच्या आशाच संपल्या. रबाडावर चौफेर हल्ला झाला. निराश होण्यापूर्वी एंगिडी जखमी झाला आणि मग आफ्रिका गोलंदाजांची लय बिघडली. समाधानकारक मारा केलेल्या इमरान ताहीरकडूनही काही फुलटॉस टाकले गेले. चुका सुरू झाल्यावर थांबत नाहीत, हेच आफ्रिकेने अनुभवले. त्यांनी झेल सोडले. सोप्या धावा दिल्या. त्यातच डावाच्या अंतिम टप्प्यात महमुदुल्ला आणि मोसाद्देक यांनी धावगती साडेसहाच्या सहज पलीकडे नेली. 

संक्षिप्त धावफलक 
बांगलादेश ः ६ बाद ३३० (तामिम इक्‍बाल १६ - २९ चेंडूत २ चौकार, सौम्या सरकार ४२ - ३० चेंडूत ९ चौकार, शकीब अल हसन ७५ - ८४ चेंडूत ८ चौकार व १ षटकार, मुशफीकर रहीम ७८ - ८० चेंडूत ८ चौकार, महमुदुल्ला नाबाद ४६ - ३३ चेंडूत ३ चौकार व १ षटकार, मुसाद्देक होसेन २६ - २० चेंडूत ४ चौकार, रबाडा १०-०-५७-०, अँदिली फेलुक्वायो १०-१-५२-२, ख्रिस मॉरिस १०-०-७३-२, इमरान ताहीर १०-०-५७-२) वि. वि.

दक्षिण आफ्रिका ः ८ बाद ३०९ (क्विंटॉन डी कॉक २३ - ३२ चेंडूत ४ चौकार, ऐदान मॅरक्रम ४५ - ५६ चेंडूत ४ चौकार, फाफ डू प्लेसिस ६२ - ५३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार, डेव्हिड मिलर ३८ - ४३ चेंडूत २ चौकार, रॅसी व्हॅन देर दुसेन ४१ - ३८ चेंडूत २ चौकार व १ षटकार, जे पी दुमिनी ४५ - ३७ चेंडूत ४ चौकार, कागिसो रबाडा नाबाद १३ - ९ चेंडूत १ षटकार, मुस्तफिझुर रहमान १०-०-६७-३, मेहीदी हसन मिर्झा १०-०-४४-१, मोहम्मद सैफुद्दीन ८-१-५७-२, शकीब अल हसन १०-०-५०-१) 
प्रतिस्पर्ध्यांची पुढील लढत - बांगलादेश ः वि. न्यूझीलंड (५ जून, लंडन - प्रकाशझोतात). दक्षिण आफ्रिका ः वि. भारत (५ जून, साऊदम्प्टन). 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News