'बालाकोट'ला महाराष्ट्रात दिवसभर सर्वाधिक सर्चिंग

शेखलाल शेख, औरंगाबाद
Wednesday, 27 February 2019

भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्यानंतर मंगळवारी (ता. 26) 'भारतीय वायुदल' आणि 'बालाकोट' हे शब्द दिवसभर गुगल सर्चच्या ट्रेंडमध्ये अग्रस्थानी राहिले. मंगळवारी "बालाकोट" या नावाने सर्वाधिक पाकिस्तानमधून आणि त्याखालोखाल भारतातून सर्च झाले. देशाचा विचार केला तर महाराष्ट्रातून "बालाकोट" नावाने गुगलवर सर्वाधिक सर्च झाल्याचे गुगल ट्रेंडमध्ये दिसते. पाकिस्तानमध्ये बालाकोट कुठे आहे, त्याचे मॅप, भारतापासूनचे अंतर, भारतीय एअरफोर्स नावाने दिवसभर गुगलवर माहिती घेण्यासाठी नेटीझन्सकडून सर्चिंग झाले. 

अरब राष्ट्रातून सर्वाधिक
भारतीय वायुदलाच्या तडाख्याने बालाकोट जगभर चर्चेत आले. हे ठिकाण पाकिस्तानात नेमके कुठे आहे, त्याचा नकाशा, बातम्या, छायाचित्रे, भारतापासूनचे अंतर याची माहिती घेण्यासाठी गुगलवर दिवसभर सर्चिंग सुरू होते. मंगळवारच्या गुगल सर्चच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पाकिस्तानमधूनच या नावाने सर्वाधिक सर्च झाले. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. यासोबतच संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार, बहारीन, नेपाळ, सिंगापूर, कुवेत, सौदी अरेबिया अशा टॉपटेन देशांतून नेटीझन्सने सर्चिंग केले आहे. टॉप दहा देशांचा विचार केला तर यामध्ये अरब राष्ट्रांतून बालाकोटची माहिती घेण्यासाठी जास्त सर्चिंग झालेले आहे. 

देशात महाराष्ट्र टॉपवर
गुगल सर्चमध्ये देशाचा विचार केला तर मंगळवारी महाराष्ट्रामधून "बालाकोट" नावाने सर्वाधिक सर्च झाले. त्याखालोखाल कर्नाटक, जम्मू काश्‍मीर, दिल्ली, सिक्कीम, हरियाणा, गोवा, उत्तराखंड, दमण, दीव, गुजरात या राज्यांचा टॉप टेनमध्ये क्रमांक लागतो. सर्चिंगमध्ये देशातील शहरांचा विचार केला तर गुरुग्राम, पिंपरी चिंचवड, नोएडा, गांधीनगर, खरगपूर येथून सर्वाधिक सर्चिंग करण्यात आले आहे. यामध्ये बालाकोट अटॅक, बालाकोट मॅप, बालाकोट स्ट्राईक, पीओके, पीओके बालाकोट यांचा समावेश आहे. यासोबत रिलेटेट टॉपिकचा विचार केला तर इंडियन एअरफोर्स नावाने दिवसभर सर्वाधिक सर्च झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News