केरळ मधील बेकल किल्ला...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 April 2020

१७ व्या शतकाच्या मध्यार्धात हा किल्ला बिदनूर च्या नायकांनी बांधून घेतला परंतु हा किल्ला चीराक्कल राजांनी बांधला आणि नायकांनी तो जिंकल्यानंतर फक्त मजबूत करून घेतला असाही एक विचार आहे

दक्षिण भारतातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक असलेला बेकल किल्ला हा केरळच्या कसरागोड या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे ३५ एकर मध्ये पसरलेला हा किल्ला अरबी समुद्राला लागून आहे.

१७ व्या शतकाच्या मध्यार्धात हा किल्ला बिदनूर च्या नायकांनी बांधून घेतला परंतु हा किल्ला चीराक्कल राजांनी बांधला आणि नायकांनी तो जिंकल्यानंतर फक्त मजबूत करून घेतला असाही एक विचार आहे विजयानगरच्या साम्राज्याच्या अस्तानंतर दाखीन भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध लोकांनी प्रयत्न सुरु केले बिदनूर चे नायक त्यातीलच एक बेकाल ला असलेले आर्थिक महत्व लक्षात घेऊन संरक्षणासाठी इथे किल्ला बंधने हि गरज झाली आणि वेन्काटप्पा नायकांनी किल्ला बांधायला सुरुवात केली तर त्याचे बांधकाम शिवाप्पा नायकाच्या कालखंडात पूर्ण झाले.

पश्चिम किनारपट्टीवर याच दरम्यान अनेक किल्ले बांधले गेले परकीय आक्रमणापासून संरक्षण हेच यामागचे मुख्य उद्दिष्ट होते नायक आणि कोलाथारी राजान्च्यामध्ये या भूभागावरून अनेक वर्षे युध्द सुरु होते शेवटी हैदर अली च्या उदयानंतर बेकल किल्ला म्हैसूर मध्ये समाविष्ट झाला अनेक वर्षे सैनिकी स्थानक म्हणून टिपू सुलतानने बेकल चा वापर केला त्याच्या मृत्युनंतर किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.

किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत आहे समुद्राच्या बाजूचा भाग दगडांच्या अनेक थरांनी बनवला गेला असून समुद्रातून होणार्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी अशा प्रकारचे बांधकाम केले आहे किल्ल्याच्या बांधकामावरून याची निर्मिती युरोपीय आक्रमणापासून बचावासाठी केल्याचे स्पष्ट होते विविध कालखंडात अनेक राजांनी किल्ल्याच्या बांधकामात बदल केले बांधकामावेली समुद्राच्या लाटांचा होणारा परिणाम सुद्धा लक्षत घेतला आहे हा किल्ला प्रशासनाचे केंद्र नव्हते त्यामुळे इथे मोठाली बांधकामे नाहीत किल्ला सैनिकी आणि संरक्षण गरजांसाठी बांधला गेला.

कर्नाटकच्या मंगलोर पासून ६० किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला पर्यटन आणि इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News