दुर्दैवाचा कोरडाचा पोळा...

योगीराज मुंडे
Friday, 30 August 2019

पाऊस नसल्यानं काळ्या आईच बदलून गेलय रूप 
खंदेमळनिला पाऊस नसल्यानं बैलराजा रुसलाय खूप

पावसात भिजत भिजत होयचा पोळ्याच्या सोहळा
उभ्या धारेत सनाला सारा गाव होयचा गोळा
कुणाचं काय चुकलं हे माहित नाही मला
दुर्दैवाने साजरा करावा लागतोय कोरडाच पोळा

झाडं तोडणारी कुऱ्हाड सुद्धा आम्ही कधी रोखली नाही
धुर्यावर असलेली झाडे सुद्धा ठेवली नाही
पाऊस नसल्यानं काळ्या आईच बदलून गेलय रूप 
खंदेमळनिला पाऊस नसल्यानं बैलराजा रुसलाय खूप

हळू हळू दुष्काळ मराठवाड्यात घुसलाय 
परिणाम त्याचा सगळ्यांच्या नजरेला दिसलाय
वाईट तर सर्वाना वाटत करायचं काहीच नाही
तो करतो कि मी करू याचीच आम्ही वाट पाही

लाखो झाडे लावलेत आम्ही रेकॉर्ड मध्ये महिन्याला
कवडीमोल किंमत दिलीय त्यांच्या वर्षभर जगण्याला
एवडी झाडे लावलेली गेली कुठं विचार मनात येतोय
दरवर्षी आम्ही जुन्याच खड्ड्यात झाड लावून यतोय

निसर्गाच्या पुढं सायन्स गेलं असा गर्व वाटतो का?
महापूर अन जळतं ऍमेझॉन थांबवायला तुमचं सायन्स खेटत का?
निसर्गासोबत बेईमानी केल्यास तो आपल्याला सोडेल का?
येणाऱ्या पोळ्याला पाऊस तर सोडाच हो ऑक्सिजन तरी मिळेल का?

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News