बाहुबली उर्वशी रौतेला ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020
  • तिचा ग्लॅमरस अंदाज तर हा चित्रपटसृष्टीतील हॉट टॉपिकच म्हणायला हवा.
  • पण सध्या उर्वशी रौतेला आपल्या चाहत्यांसमोर वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतांमध्ये आली आहे.

मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला हि नेहमीच चर्चेत असते ती तिच्या मादक अदांवरून.तिचे नृत्यामधील लटके - झटके तर नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करून सोडतात.

तिचा ग्लॅमरस अंदाज तर हा चित्रपटसृष्टीतील हॉट टॉपिकच म्हणायला हवा.पण सध्या उर्वशी रौतेला आपल्या चाहत्यांसमोर वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतांमध्ये आली आहे.

उर्वशी रौतेला हि सध्या तिच्या फिटनेसवर चांगलीच लक्ष देताना दिसतेय.सध्या ती जिम मध्ये जाऊन प्रचंड मेहनत घेताना दिसतेय.

जिममध्ये तर तिने नुकतेच वेटलिफ्टिंग केले. तिने केलेले हे वेटलिफ्टिंग थोडेथोडके नसून तब्बल १०० किलो वजनाचे वेटलिफ्टिंग आहे. तिने स्वतःच हि माहिती तिच्या बधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली. त्यामुळे आता उर्वशीला ग्लॅमरस उर्वशी रौतेला म्हणायचे कि बाहुबली उर्वशी म्हणायचे हा प्रश्न आता चांगलाच ट्रेंडमध्ये राहणार अस वाटतय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News