बाबो! लॉकडाऊन काळात कंडोमची विक्री दुप्पटीने वाढली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 March 2020
प्राथमीक उपचाराठी लागणारे औषधी नागरिक मोठ्या प्रमाणत खरेदी करत आहेत. त्याच बरोबर मास्क, सॉनेटायझर आणि कंडोमची मागणी वाढली आहे. साधारण तीन कंडोमच एक पाकीट खऱेदी करणारा ग्राहक दहा कंडोम असलेल्या एका पॉकीटची मगणी करत आहे

मुंबई: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला. बलाढ्य चिनपासून अमेरिकेपर्यत सर्वच देशावर कोरोनाचे सावट पसरले, भारतातही कोरोना रुग्णांची सख्या वरचेवर वाढतचं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. 'लॉकडाऊन काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक वास्तूंचा पुरवठा सुरळीत चालू असेल, नागिरकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही' असे सांगितले. तरी देखील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरोदी करण्यासाठी तुबंळ गर्दी केली.

२१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे अन्न धान्य आणि औषधांची साठवणूक मोठ्या प्रणाणात केली जात आहे. प्राथमीक उपचारासाठी लागणारे साहित्य खरेदी केली जात आहे. महत्त्वाच म्हणजे मेडीकल मधून कंडोम खरेदी करण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे अशी माहिती औषध विक्रेत्या दुकानदारांनी दिली.

प्राथमीक उपचाराठी लागणारे औषधी नागरिक मोठ्या प्रमाणत खरेदी करत आहेत. त्याच बरोबर मास्क, सॉनेटायझर आणि कंडोमची मागणी वाढली आहे. साधारण तीन कंडोमच एक पाकीट खऱेदी करणारा ग्राहक दहा कंडोम असलेल्या एका पॉकीटची मगणी करत आहे. त्यामुळे ५० टक्यानी कंडोमची विक्री वाढली आहे, अशी माहिती मेडीकल विक्रेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.

साधारण नविन वर्षाच्या स्वागताला आणि व्हॅलेनटाईन विक काळास कंडोमची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र लॉडाऊन काळात कंडोमची विक्री दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे आम्ही कंडोमची साठा ५० टक्यानी वाढवला आहे. लॉकडाऊन काळात अचानक पणे कंडोमची वढलेली विक्री आमच्यासाठी आश्चर्यकारण आहे असेही विक्रीते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News