आयुष्मान खुराणा समलैंगिक पुरुषाची व्यक्तिरेखा साकारताना 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020

हा चित्रपट समलैंगिक नातेसंबंधावर आधारित आहे आणि आयुष्मान यामध्ये एका समलैंगिक पुरुषाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एलजीबीटीक्‍यू समुदायाबाबत समाजामध्ये अधिक जनजागृती निर्माण व्हावी, एक चांगला संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी त्याने हा चित्रपट स्वीकारला आहे.

आयुष्मान खुराणा ग्लॅमरस नव्हे; तर हटके आणि महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यात अग्रेसर आहे. म्हणूनच एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देण्यात तो सरस ठरला. आताही ‘शुभमंगल जादा सावधान’ हा चित्रपट त्याने एका खास कारणामुळे स्वीकारला आहे.

हा चित्रपट समलैंगिक नातेसंबंधावर आधारित आहे आणि आयुष्मान यामध्ये एका समलैंगिक पुरुषाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एलजीबीटीक्‍यू समुदायाबाबत समाजामध्ये अधिक जनजागृती निर्माण व्हावी, एक चांगला संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी त्याने हा चित्रपट स्वीकारला आहे.

आयुष्मान सांगतो, ‘आपण सर्व एक आहोत हे प्रत्येकापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. ‘शुभमंगल जादा सावधान’सारख्या चित्रपटामधून मला समाजामध्ये या संवेदनशील विषयाबाबत जनजागृती करायची आहे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News