आयुष्मानचं पुन्हा 'शुभ मंगल ज्यादा सावधान'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 January 2020

'विकी डोनर'  चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना हा बॉलीवूडमधील कमी वेळेत यशस्वी होणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आयुष्मान नेहमीच आव्हानात्मक भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या समोर येत असतो.

मुंबई: 'विकी डोनर'  चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना हा बॉलीवूडमधील कमी वेळेत यशस्वी होणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आयुष्मान नेहमीच आव्हानात्मक भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या समोर येत असतो. आणि म्हणूनच अगदी कमी कालावधीत त्याचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने वाढत आहे.आयुष्मानचा आगामी चित्रपट ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला. चित्रपटात आयुष्मान एका 'गे' तरुणाची भूमिका साकारत आहे. त्यामुळेच तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले.  आयुष्मानच्या आईवडिलांनीही हा ट्रेलर पाहिल्यानंतर 'त्यांना आनंद झाला असून माझा अभिमान वाटला, त्यामुळे आपल्या कष्टाचे चीझ झाल्याचे आयुष्मानने सांगितले'. परंतु आपल्या वडिलांनी 'गे' ची भूमिका साकारल्यामुळे आयुष्मानच्या मुलाला काय वाटलं? याबद्दल आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपनं आपल्या ट्विटद्वारे सांगितले आहे. 

'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांनंतर आम्ही मुलाला प्रश्न केला की, तुला होमोसेक्शुअलिटी किंवा ‘गे’चा अर्थ माहित आहे का? त्यावर तो म्हणाला हो. मी पुन्हा विचारलं तुला त्याबद्दल काही समस्या आहे का? त्यावेळी त्याने दिलेल्या उत्तराने आमच्या डोळ्यात पाणी आलं. यावेळी तो असं म्हणाला की,यामध्ये कोणतीही समस्या असण्याचं कारण काय? 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News