मराठी भाषादिनानिमित्त फ्लॅश मॉब’च्या माध्यमातून जनजागृती...  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

गुरुवारी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून सीएसएमटी येथे २० ते २५ तरुण-तरुणींच्या पथकाने मराठी अभिमान गीतावर समूहनृत्य केले.

मुंबई : मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (ता. २७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘मान मराठी मनाचा’ उपक्रमात मराठमोळ्या गाण्यावर ‘फ्लॅश मॉब’ सादर करण्यात आला. तरुणांचे नृत्य पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.

‘मान मराठी मनाचा’ उपक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यांत राबवला जात आहे. गुरुवारी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून सीएसएमटी येथे २० ते २५ तरुण-तरुणींच्या पथकाने मराठी अभिमान गीतावर समूहनृत्य केले. सादरीकरणाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी या माध्यमातून रेल्वेच्या यूटीएस ॲपबाबत जनजागृतीही केली. ‘मान मराठी मनाचा’ उपक्रमातून संतसाहित्य, कला-संस्कृती जोपासण्याचे काम केले जाते. महाराष्ट्रातील विविध संस्था एकत्र येऊन हा उपक्रम राबवतात. त्याअंतर्गत शाळांमध्ये विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News