त्वचेच्या आरोग्यासाठी या सवयी गरजेच्याच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

त्वचा नाजूक असल्याने तिची काळजी घेणे गरजेचे आहे. कितीही प्रयत्न केले तरी त्वचेवर ग्लो येत नसल्याचे पाहायला मिळते. याला आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही चुका कारणीभूत असतात.

त्वचा नाजूक असल्याने तिची काळजी घेणे गरजेचे आहे. कितीही प्रयत्न केले तरी त्वचेवर ग्लो येत नसल्याचे पाहायला मिळते. याला आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही चुका कारणीभूत असतात.त्वचेसाठी जास्त गरम पाणी हानिकारक असते. यामुळे त्वचा कोरडी पडते. तुम्हाला रोज गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असल्यास त्वचा कोरडी पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अतिगरम पाण्याने अंघोळ किंवा हॉट शॉवर घेणे टाळा.

अधिक प्रमाणात मीठ किंवा साखर खाल्ल्याने त्वचा कोरडी पडून निस्तेज दिसू लागते. अतिसाखर खाल्याने कोलाजनचे प्रमाण कमी होते आणि त्वचा लूज पडू लागते. कुशीवर झोपणे ही तुमच्या त्वचेसाठी हानिकारक बाब आहे. कुशीवर झोपल्याने तुमची त्वचा उशीवर घासली जाते. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

पोहणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी अति पोहण्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. स्वीमिंग पुलाच्या पाण्यात क्‍लोरिन असते. यामुळे त्वचा खराब होते. पोहून झाल्यानंतर अंघोळ केल्यावरही त्वचेवरील क्‍लोरिन पूर्णपणे निघून जात नाही.

धूम्रपानानेही तुम्ही वयस्कर दिसू लागता. सिगारेटच्या धुरातील घातक निकोटिन त्वचेला हानी पोचवते. त्यामुळे तुम्ही धूम्रपान करीत असल्यास अथवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहत असल्यास तुमच्याही त्वचेला हानी पोचू शकते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News