या सवयी टाळा; आरोग्य चांगले ठेवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019

आरोग्य चांगले राहावे यासाठी आहार चांगला असणे गरजेचे आहेच; पण त्याचबरोबर स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे. यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.

आरोग्य चांगले राहावे यासाठी आहार चांगला असणे गरजेचे आहेच; पण त्याचबरोबर स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे. यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुऊनच स्वयंपाक करायला घ्यावा, तसेच जेवण बनवण्याआधी किंवा जेवणापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्‍यक आहे. 

निरोगी आरोग्यासाठी स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. घरात कोठेही पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. स्वयंपाक बनवण्याआधी भांडे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्या. ती कोरडी करून घ्या. आहारात जास्तीत जास्त ताज्या भाज्या, फळे, दूध यांचा समावेश करा. शिळे अन्नपदार्थ खाणे टाळा.

जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. आहारामध्ये दूध, दही, डाळ, हिरव्या भाज्या यांचा समावेश करा. ताटात विविध पदार्थ असू द्या. जेवण बनविण्यासाठी सोयाबीन, सनफ्लॉवर, मका या तेलांचा वापर करा. साखर व मीठ यांचा कमीत कमी वापर करा. रात्रीचा आहार हलका असला पाहिजे व तो आठ वाजण्याचा आत झाला पाहिजे. 

जेवणामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. परंतु, जास्त किंवा कमी जेवण आपल्या आरोग्याला धोका पोचवू शकते. यासाठी योग्य प्रमाणात जेवण घ्या. जेवणाच्या वेळा ठरवून त्या वेळेसच जेवण घेणे कधीही उत्तम. बटाट्याचा कीस करण्यासाठी बटाटे आदल्या दिवशी रात्री उकडावेत व ते फ्रीजमध्ये ठेवावेत. बटाटे थंड झाल्यामुळे कीस लवकर सुटा होतो.

लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून बरणीच्या आतील बाजूने तिळाचे तेल गरम करून घालावे. नंतर बरणीत लोणचे भरावे. तळणीच्या मिरच्या कायम पॅकबंद डब्यामध्ये ठेवाव्यात, म्हणजे त्या कुरकुरीत राहतात. लाल तिखट चांगले राहावे म्हणून त्यात हिंगाचे खडे टाकावेत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News