सुदृढ राहण्यासाठी हे टाळा

व्हायरल
Monday, 8 April 2019

नैराश्‍याच्या लक्षणांवर लक्ष केंद्रित केले, तर त्यावर वेळीच उपाय करता येऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांनी नैराश्‍य टाळण्यासाठी खालील उपाययोजना करावी. वयोमानानुसार आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. एकटे राहण्यामुळे नकारात्मक विचार येतात, त्यामुळे घरात व घराबाहेर एकटे राहणे टाळावे. डॉक्‍टरांनी सुचविलेल्या गोळ्या व औषधे नियमितपणे व वेळेवर घ्याव्यात.

ज्या कार्यक्रमांची निमंत्रणे येतात, त्यातील बहुतेक ठिकाणी जावे. जाणे जमत नसल्यास फोनवर, पत्राने संपर्क करून त्यांना भावना कळवाव्यात, जेणेकरून स्वतःला व्यग्र ठेवता येईल. वाढदिवस लक्षात ठेवून आप्तेष्टांना आठवणीने शुभेच्छा देणे, यासारखे मेंदूला सक्रिय ठेवणारे कार्य करीत राहा.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत आपले वेळापत्रक निश्‍चित करावे. व्यायाम, प्राणायाम, फिरणे, बागेत जाणे, नातवंडांसोबत खेळणे, घरच्या कामात मदत करणे, फोन उचलणे, घरची बेल वाजल्यास दार उघडणे ही कामे करून स्वतःला कामात गुंतवून ठेवावे. कोणतेही काम करण्याचे टाळू नका, कारण थांबला तो संपला. संपायचे नसल्यास थांबू नका, काम टाळू नका.

बुद्धीशी निगडित सर्व कामे आठवणीने करा. उदा. घरचा हिशेब, ज्या बिल्डिंगमध्ये राहता, त्या ठिकाणचा महिन्याचा हिशेब, वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडविणे वेळ घालवण्यासाठी चांगले आहे.अनेक ज्येष्ठ मंडळींचे कट्टे असतात, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही व्यक्त होऊ शकता. सगळेच समवयस्क असल्याने भावना समजून घेऊ शकतात.

ज्येष्ठांसाठी अनेक ठिकाणी विरंगुळा केंद्रही उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी विविध ॲक्‍टिव्हिटी, कार्यशाळा घेतल्या जातात, त्यामध्ये सहभाग घ्या. सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्या, या ठिकाणी काम करणाऱ्या मंडळींची गरज असते. यामुळे तुम्ही मनाने सुदृढ राहू शकता. या सूचनांचे पालन केल्यास नैराश्‍याला जवळ भटकतासुद्धा येणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News