अवलिया तरुणाची भन्नाट कल्पना; आपोआप होणार रक्कम निर्जंतुकीकरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

फक्त मार्कावरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसत नसून येत नाही तर इनोव्हेटिव्ह कल्पनेतून नवनवीन प्रयोग करताना विद्यार्थी दिसतात. असाच एक प्रयोग दिग्विजयने आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये केला. 

कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्ष व्यवहार करताना अनेक वेळा नोटांना हात लागतो, त्यामुळे कोरोनाचा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. यावर अकरावीच्या एका अवलिया तरुणाने नोटा निर्जंतुकीकरण करण्यासाठी मशीन तयार केली आहे. त्यामुळे आपोआप गल्यातील रक्कमनिर्जंतु होत आहे. या यंत्रामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरुणाईने निर्माण केलेल्या नोटानिर्जंतुकीकरण मशीनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

कासार्डे माध्यमिक शाळेचा विद्यार्थी दिग्विजय मुकुंद जाधवने दहावीत 98.80  मार्क मिळवले. जिल्ह्यात पाचवा तर राज्यात सातवा क्रमांक पटकावला. त्यामुळे गावाचे नाव राज्यात रोशन केले. फक्त मार्कावरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसत नसून येत नाही तर इनोव्हेटिव्ह कल्पनेतून नवनवीन प्रयोग करताना विद्यार्थी दिसतात. असाच एक प्रयोग दिग्विजयने आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये केला. 

दिग्विजयच्या वडिलांचे कासार्डे तिठा येथे मारुती मेडिकल स्टोर आहे. यावेळी व्यवहार करताना अनेक वेळा पैशांना हात लागतो, त्यामुळे संसर्ग होण्याची भीती आहे. कोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही करता येईल का? अशा सुचना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी. एम. इंगळे यांनी दिग्विजयच्या वडिलांना दिल्या. दिग्विजय बसून सर्व ऐकत होता, आपणही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही करू शकतो का? त्याचा विचार दिग्विजयच्या मनामध्ये सुरु झाला आणि कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण मशीन त्यातून तयार झाले अशी माहिती दिग्विजयाच्या वडिलांनी दिली.

मानवी शरीरावर नेहमी अल्ट्रावायलेट किरण पडल्यास कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते, दिग्विजयने बनवलेल्या मशीद्वार पैसे ठेवण्याचे काउंटर बंद  केल्यास ल्ट्राव्हायलेट किरण रक्कमेवर पडतात त्यामुळे कोणाचा विषाणू नायनाट होतो, जेव्हा काऊंटर ओपन केले जाते तेव्हा अल्ट्राकिरण बंद होतात, त्यामुळे किरणाचा संबंध मानवी शरिराशी येत नाही, असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एम. इंगोले यांनी व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News