शाहरूखच्या सामाजिक कार्याला ऑस्ट्रेलियन प्राध्यापकांची मदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 September 2019
  • अभिनेता शाहरूख खान सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर असला तरी त्याचे सामाजिक कार्य सुरूच आहे.

मुंबई : अभिनेता शाहरूख खान सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर असला तरी त्याचे सामाजिक कार्य सुरूच आहे. ऑस्ट्रेलियातील ‘ला ट्रोब’ विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक जॉन डेवर यांनी शाहरूखच्या ‘मीर फाऊंडेशन’ला दोन लाख तीस हजार रुपयांची मदत केली आहे. शिवाय ‘शाहरूख खान-ला ट्रोब युनिव्हर्सिटी पीएचडी’ ही शिष्यवृत्ती एका होतकरू महिला संशोधकाला दिली जाणार आहे.

या शिष्यवृत्तीद्वारे एक कोटी रुपयांची मदत त्या महिलेला दिली जाणार आहे. सबळ आणि परिणामकारक काम करणाऱ्या महिला संशोधकाला ही शिष्यवृत्ती दिली जाईल. शाहरूखची ‘मीर फाऊंडेशन’ ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. तसेच ॲसिड हल्ल्यातील पीडित महिला आणि गरजू महिलांसाठी ही संस्था वेळोवेळी मदत करत असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News