आश्रमातच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, १२ जणांची केली सुटका..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • बीड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका १४ वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आश्रमातील इतर ७ मुली आणि ५ अल्पवयीन मुलांची ही जिल्हा बाल हक्क समिती आणि पोलिसांनी इथल्या अश्रमावर छापा मारून त्यांची सुटका केली आहे.

बीड :- बीड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका १४ वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आश्रमातील इतर ७ मुली आणि ५ अल्पवयीन मुलांची ही जिल्हा बाल हक्क समिती आणि पोलिसांनी इथल्या अश्रमावर छापा मारून त्यांची सुटका केली आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशिल कांबळे यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या त्या ७ मुली आणि ५ मुलांना बाल कल्याण समितीच्या मार्फत सुधारगृहात ठेवण्यात आले असून पळवून नेलेल्या मुलीवर अत्याचार झाला आहे का? याचा तपास बालकल्याण समितीच्या मार्फत केला जात आहे.

देवस्थानावरील या मुलीच्या तक्रारीमुळे ७ मुलींची सुटका झाल्याचे समोर आले आहे. मुलींची सुटका केल्यानंतर आता अनेक देवस्थानांमध्ये ठेवलेला अल्पवयीन आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सार्वजनिक ठिकाण असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर असतो अशा ठिकाणी देवस्थानकडून मुला-मुलींचा कोणत्या सुरक्षा घेतल्या जातात. याबाबत आता पोलिसांने तपासणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केले आहे.

मांजरसुंबा घाट चढून गेल्यावर एक श्रीकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर महानुभव पंथाचे आहे. या ठिकाणी अनेक आश्रम आहेत यात महिला-पुरुष भक्त राहतात. तर काही मुले मुली आध्यत्मिक शिक्षण घेण्यासाठी ठेवतात. अशाच एका १४ वर्षीय मुलीला १५ दिवसापुर्वी एका विवाहित भक्ताने तिला पळवून नेले. या प्रकरणात देवस्थानचा संबंध नाही, आम्ही शिक्षण देतो घडलेला प्रकार अनपेक्षित आहे. त्या संबधीत व्यक्तीवर कडक कारवाई करावी असे या देवस्थान सारंगधर महाराज यांनी सांगितले.

या प्रकरणांमध्ये आता पोलीस तपासानंतर सत्य समोर येणार आहे. मात्र, देवस्थानावर अनधिकृतपणे मुले आणि मुली शिक्षणाचा हेतूने की ठेवल्यानंतर त्यांच्या संदर्भात घडलेल्या गैरप्रकारात जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे अशा मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी ठेवत असताना देखील शासकीय परवानगी घेऊनच त्यांना आश्रमात ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कडून केली जात आहे तर पालकांनी देखील काळजी घ्यावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News