महाराष्ट्रातील मच्छीमारामध्ये संभ्रमाचे वातावरण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

मासेमारी हंगाम कोरोना काळात कधी सुरू करावा ह्याची चर्चा आधी गुजरात मध्ये सुरु झाली असून त्यांनी केंद्र सरकार कडे राज्यातील मच्छीमारी हंगामाला 1 सप्टेंबर ला सुरुवात करावी असा ठराव करून केली

भाईंदर: मासेमारी हंगाम कोरोना काळात कधी सुरू करावा ह्याची चर्चा आधी गुजरात मध्ये सुरु झाली असून त्यांनी केंद्र सरकार कडे राज्यातील मच्छीमारी हंगामाला 1 सप्टेंबर ला सुरुवात करावी असा ठराव करून केली तेव्हा पासून महाराष्ट्रातील मच्छीमारामध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते.महाराष्ट्रात हा हंगाम कधी सुरु करायचा या बाबत निर्णय लॉक डाऊन मुळे सभा न झाल्याने पुढे गेला होता अखेर यावर मार्ग काडून राज्यातील मच्छीमारांनी मच्छीमारीचा हंगाम ऑगस्ट पासून सुरु करण्याची मागणी ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांनी घेतला आहे. अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्यध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सकाळशी बोलताना दिली.

गुजरात मधील मच्छीमारांनी मच्छीमारीचा हंगाम सप्टेंबर मध्ये सुरु करण्याची मागणी केंद्र कडे केल्याने महाराष्ट्रातील मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता यावर निर्णय घेण्यासाठी सभा घेण्याचे निश्‍चित झाले होते परंतु लॉक डाऊन मुळे सभा रद्द होत असल्याने निर्णय होत नव्हता यावर मार्ग काडत प्रत्येक संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी आप आपल्या संस्थेत जमा होऊन फोन द्वारे whatsapp विडिओ कॉल द्वारे सभा घेऊन निर्णय घेण्यात महत्वाचं निर्णय म्हणजे मासेमारी हंगाम शासनाने दिनांक 01 ऑगस्ट पासून सुरू व्हावा असा असल्याने ह्या कोरोना काळात व मासळी निर्यात कंपन्यांनी भाव निश्‍चित होई पर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट ला सुरू करावा व तो कायम स्वरूपी असावा व संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छीमाराना लागू असावा असा ठराव ठाणे जिल्ह्यातील संस्थानी घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात जर मासळी मार्केट बंद करावी लागली तर मच्छीमाराना पर्यायी जागा उपलब्ध करावी. तसेच अश्‍या वेळी व्यापाऱ्यानी सहकार्य केले नाही तर संस्था मार्फत शिखर संस्थेने शासनाच्या माध्यस्तीने मासळी खरेदी विक्री सुरू करावी,ठाणे जिल्हा मच्छिमार संघ, महाराष्ट्र मच्छिमार संघ, यांनी सर्व संस्थांमार्फत मासळी खरेदी करावी.

राज्य सरकारने MPEDA च्या मध्यस्तीने राज्यातील मासळी निर्यातदार सर्व कंपन्याना एकत्र बोलवून मासळीचे दर निश्‍चित करावे किंवा शेतकऱयांच्या माला प्रमाणे शासनाने खरेदी करून दिलासा द्यावा,कोरोना काळात पर राज्यातून येणारे खलाशी आपल्या हद्दीत येताना कोणकोणती खबरदारी घ्यावी, व चालू सिजन मध्ये बोटीतील एका खलाशयाला कोरोना लागण झाली तर बाकीच्या सर्वाना ( अलगिकरण )क्वारेटाईन कुठे व कसे करावे.लोकल मासळी मार्केट एखादी हद्द बंद झाल्यास शासनाने इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करावी.

वरील सर्व विषयावर चर्चा करण्यात आली वरील मागण्या राज्य शासनाकडे मांडाव्या व तात्काळ संबंधित अधिकारी , निर्यातदार, व मच्छिमार यांची बैठक मंत्री यांच्याकडे करावी असा ठराव करण्यात आला सदर चर्चेत ठाणे जिल्ह्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते यात उत्तन मच्छिमार वि कासहकारी सोसायटी ली. उत्तन मच्छिमार व वाहतूक सोसायटी ली. , पाली उत्तन मच्छिमार सहकारी सोसायटी ली. धी डोंगरी चौक फिशरमेन्स सहकारी सोसायटी याबरोबरच अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे बर्नड डिमेलो, अंतोनी तान्या , डेनिस नून ,बोयेतूर गौरया , विजय थोपेल्या , नेस्टर बाविघर, जॉन गऱ्या, माल्कम कासुघर, डिक्‍शन डिमेकर, फ्रॅंकी गाडेकर,गिलबर्ट भानजी, रेगो बुंकवली, ब्रायन घोसाळ ,अजबन बांड्या, ऑस्टिन नातो, ऑस्टिन बोटेंऱ्या इतर पदाधिकारी व मच्छिमार उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News