जगज्जेतेपदे विकून, पंतप्रधान निधीस मदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 April 2020

देशभरातील अनेक क्रीडापटूंची रक्कम अर्जुनपेक्षा जास्त असली, तरी त्याने विजेतेपदेही विकून रक्कम उभारल्याने ती खूपच मोलाची आहे. अर्जुनने मित्र तसेच नातेवाईकांना हे विजेतेपदाचे करंडक घेण्याची विनंती केली.

नवी दिल्ली ः पंधरावर्षीय गोल्फ खेळाडू अर्जुन भाटी याने आठ वर्षांत जिंकलेल्या शंभरहून अधिक स्पर्धा विजेतेपदे जिंकून त्याद्वारे मिळालेले सव्वाचार लाख रुपये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत.

देशभरातील अनेक क्रीडापटूंची रक्कम अर्जुनपेक्षा जास्त असली, तरी त्याने विजेतेपदेही विकून रक्कम उभारल्याने ती खूपच मोलाची आहे. अर्जुनने मित्र तसेच नातेवाईकांना हे विजेतेपदाचे करंडक घेण्याची विनंती केली. त्यात तीन जागतिक विजेतेपदांचा समावेश होता. ""आपला देश सध्या खूपच कठीण परिस्थितीतून जात आहे. प्रत्येकाने आपल्याला शक्‍य होईल, त्या मार्गाने मदत करायला हवी. गेल्या आठ वर्षांत मी 102 करंडक जिंकले आहेत.

आई-वडिलांच्या मित्रांना, नातेवाईकांना हे करडंक घेऊन त्याबद्दल पैसे देण्याची विनंती केली. त्यातून 4 लाख 30 हजार रुपये गोळा झाले. ते सर्व मी पंतप्रधान मदतनिधीस दिले आहेत," असे अर्जुनने सांगितले.

कोरोनाविरुद्धच्या मोहिमेसाठी आपलेही योगदान असावे, असे वाटत होते. मी काही स्वतः कमवत नाही. त्यामुळे मी विजेतेपदाचे करंडक विकण्याचे ठरवले. ही स्पर्धा-विजेतेपदे मी नंतरही जिंकू शकतो. पण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पैशाची गरज असताना मी शांत बसू शकत नाही. विकलेली सर्व विजेतेपदे सध्या घरात आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर मी ज्यांनी ती घेतली, त्यांच्याकडे देणार
आहे.
 

आत्तापर्यंत जिंकलेली 102 विजेतेपद जिंकून मिळवलेले 4 लाख 30 हजार रुपये पंतप्रधान मदतनिधीस दिले हे ऐकल्यावर आजीला अश्रू आवरले नाहीत, पण लगेच सावरत ती म्हणाली, तू खरा अर्जुन आहेस. आज देशवासीयांना वाचवण्यासाठी तू ट्रॉफी विकल्या आहेस, उद्या तू त्या पुन्हा जिंकू शकशील.
- अर्जुन भाटीचे ट्‌वीट

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News