माजी विद्यार्थ्यांकडून 1 लाख 20 हजार श्रमिकांना मदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 June 2020

वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) वितरित करण्यापासून ते निधी उभारण्यापर्यंत काम केले 

मुंबई. : बेंगलुरु नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (एनएलएसआययू)च्या माजी विद्यार्थ्यांनी श्रमिक गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी श्रमिकांची सेवा हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एक लाख 20 हजारांहून अधिक कामगारांना आहार आणि पाण्याचे वितरण करण्यात आले आहे.

कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यांमुळे अनेकांचे हाल सुरु झालेत. यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आणि समुदायांनी पुढे येऊन वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) वितरित करण्यापासून ते निधी उभारण्यापर्यंत काम केले आहे. यामधील एनएलएसआययूच्या काही माजी विद्यार्थ्यांनी प्लॅटफॉर्म व वेळापत्रकांबाबत प्रवाशांना सतर्क करण्यासाठी घराबाहेर पडून तसेच मदत शिबिरांमध्ये जावून श्रमिक कामगारांची मदत केली.

श्रमिकांसाठी गाड्यांचीही व्यवस्था

विद्यार्थ्यांनी नोडल अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि रेल्वे यांच्यात नियमितपणे समन्वय साधून हजारो श्रमिकांना घरी जाण्यासाठी गाड्यांची त्वरित व्यवस्थाही केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई-विलापुरम, ठाणे-हल्द्वानी, मुंबई-रांची, दिल्ली-पूर्णिया आणि इतर बऱ्याच ठिकाणी अल्प वेळातच रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली गेली. या श्रमिक सेवा उपक्रमात वकिलांची टिममधील रवींद्र झुंझुनवाला, गोपाल शंकरनारायणन, पूर्णिमा संपत, यश आशर, समीरा वासुदेव, साईकृष्ण राजगोपाल आणि निखिल चंद्र यांनी सहभाग घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News