संभाजी ब्रिगेड लढविणार विधानसभा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

नांदेड - जिल्ह्यातील विधानसभांचा आढावा; पाच उमेदवार इच्छुक आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आखरे यांनी शनिवारी (ता. एक) जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

नांदेड - जिल्ह्यातील विधानसभांचा आढावा; पाच उमेदवार इच्छुक आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आखरे यांनी शनिवारी (ता. एक) जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, संतोष गाजरे, लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, श्याम पाटील, भगवान कदम, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे आदींची उपस्थिती होती. 

श्री. आखरे म्हणाले की, ‘‘दारूमुक्त गाव... शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव... हे ब्रिद वाक्य घेऊन संभाजी ब्रिगेडतर्फे नांदेड जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका लढविल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत तत्काळ खात्यात जमा करा, अशी संभाजी ब्रिगेडची आग्रही मागणी आहे.’’ 

व्यवस्था परिवर्तन हे ध्येय घेऊन छत्रपती शिवरायांचे स्वराज्य साकारण्यासाठी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पदाधिकाऱ्यांनी रबरी शिक्के राहू नये. संघटना बांधणीसाठी वेळ द्यावा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुथ बांधणी करण्याच्या सूचना सौरभ खेडेकर यांनी दिल्या.

जिल्ह्यात बुथ बांधणीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी प्रास्ताविकातून दिली. प्रारंभी जिजाऊपूजन व जिजाऊ वंदना घेण्यात आली. गजानन इंगोले यांनी सूत्रसंचालन केले; तर दशरथ कदम यांनी आभार मानले. या वेळी सुभाष कोल्हे, सूरज पाटील, बाळू भोसले, मोहन शिंदे, जयदीप जाधव, बालाजी पाटील, हणमंत कदम, जेजेराव शिंदे, साईनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News