‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात शहीद भाई कोतवाल या भूमिकेत - आशुतोष पत्की

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात तो शहीद भाई कोतवाल यांची भूमिका साकारत आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात भाई कोतवाल यांनी वीरमरण पत्कारले.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की सध्या छोट्या पडद्यावरील ट्रेण्डिंग चेहरा ठरत आहे. कलाक्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आशुतोष मेहनत घेत आहे. मालिका करत करत त्याने मराठी चित्रपटांनाही तेवढाच वेळ द्यायचे ठरविले आहे.

रुपेरी पडद्यावर एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे चालून आली आहे. ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात तो शहीद भाई कोतवाल यांची भूमिका साकारत आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात भाई कोतवाल यांनी वीरमरण पत्कारले.

त्यांची ही संपूर्ण धाडसी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता आशुतोष त्याला मिळालेल्या या सुवर्णसंधीचं सोनं करतो का, ते पाहूया.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News