‘प्रवास’ या चित्रपटात अशोक-पद्मिनी एकत्र 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 January 2020

‘प्रवास’ या चित्रपटात हे दोघेही एकत्र येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘जे शेष आहे तेच विशेष आहे’ अशी या चित्रपटाला टॅगलाईनही देण्यात आली आहे. या दोघांच्या नात्याचा अनोखा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केवळ मराठी चित्रपटांमध्येच नाही, तर हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाची जादू निर्माण केली. त्याचबरोबर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचीही ‘प्रेमरोग’, ‘चिमणी पाखरं’, ‘सौतन’सारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.

आता हे दोघेही दिग्गज पहिल्यांदाच एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. ‘प्रवास’ या चित्रपटात हे दोघेही एकत्र येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘जे शेष आहे तेच विशेष आहे’ अशी या चित्रपटाला टॅगलाईनही देण्यात आली आहे. या दोघांच्या नात्याचा अनोखा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटात या दोघांसोबत अभिनेते विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकरसारखे कलाकारही झळकणार आहेत. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांचे आहे; तर ओम छंगानी फिल्म्स यांची निर्मिती आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News