...यामुळे एश्‍ले बार्टीने यूएस ओपनमधून माघार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • वाढत्या कोरोना विषाणूमध्ये प्रवास करण्याची जोखीम पत्करणार नसल्याने जगातील पहिल्या क्रमांकाची ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू एश्‍ले बार्टीने यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. 
  • ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतून माघार घेणारी सर्वात नामांकित खेळाडू आहे.

न्यूयॉर्क :- वाढत्या कोरोना विषाणूमध्ये प्रवास करण्याची जोखीम पत्करणार नसल्याने जगातील पहिल्या क्रमांकाची ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू एश्‍ले बार्टीने यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतून माघार घेणारी सर्वात नामांकित खेळाडू आहे. शिवाय “माझ्या संघाने आणि मी निर्णय घेतला आहे, की आम्ही यावर्षी वेस्टर्न आणि साउदर्न ओपन आणि यूएस ओपनसाठी प्रवास करू शकणार नाही.” हा एक कठीण निर्णय होता; परंतु कोव्हिड १९ मुळे अजून बरेच धोके निर्माण होऊ शकतात आणि मी या परिस्थितीत माझा संघ आणि स्वत:ला संकटात घालणार नाही, असे यूएस ओपनच्या संघटनेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याव्यतिरिक्त पॅरिसमध्ये २७ सप्टेंबर ते ११ ऑक्‍टोबरदरम्यान फ्रेंच ओपन स्पर्धा होणार आहे. लवकरच मी फ्रेंच ओपनबद्दल माझा निर्णय सांगेन. डब्ल्यूटीए (महिला टेनिस असोसिएशन) युरोपियन स्पर्धा होणार आहे, त्याबाबत मला आणि माझ्या संघाने निर्णय घ्यावा लागेल, असे बार्टीने सांगितले. दरम्यान बार्टीने कारकिर्दीतील एकमेव ग्रॅंड स्लॅम २०१९ मध्ये फ्रेंच ओपन जिंकले आहे. यामध्ये झेक प्रजासत्ताकने मार्केटा वोंड्रोसोव्हाला पराभूत केले होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News