आर्वी मतदारसंघात कॉंग्रेस- भाजपाच्या या दोन उमेदवारात होणार युद्ध

भुपेश बारंगे
Tuesday, 11 June 2019
  • सध्या कॉंग्रेसचे आमदार अमर काळे आहेत
  • हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला
  • भाजपचे दादाराव केचे यांनी पाच वर्ष आर्वी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले
  • सध्या तीन पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहेत.

कारंजा(वर्धा): आर्वी मतदारसंघात सध्या कॉंग्रेसचे आमदार अमर काळे आहेत. हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. एकदाच या मतदारसंघात कमळ फुलले आहे. त्यात भाजपचे दादाराव केचे यांनी पाच वर्ष आर्वी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानी गावागावात जाऊन आपला पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले आहे. जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये मोठ्या प्रमाणत आपले उमेदवार निवडून आणले आहे.  

सध्या तीन पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपने सध्या शिखर गाठला असला तरी आर्वी मतदारसंघात भाजप पक्षात उमेदवारांची अग्निपरीक्षा आहे. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा सल्लागार असलेले सुधीर दिवे यांची आर्वी मतदार संघात लुडबुड सुरू असल्याने माजी आमदार दादाराव केचे डावलून आपली एण्ट्री करण्याचा प्रयत्न दिवेकडून होताना दिसत आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याचे प्रमुख म्हणून सुधीर दिवे यांनी काम केले. त्यात मोठ्या मताधिक्याने खासदार निवडून आणण्यात यश प्राप्त झाले. आर्वी मतदारसंघात  सध्या महिलाना प्रलोभन देण्याचे काम केले जात असुन यावरून येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आर्वी मतदारसंघात पहिल्यांदाच माजी आमदार दादराव केचे यांनी कमळ उगविले. तेव्हापासून भाजप पक्षांचा प्रभाव वाढत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आर्वी मतदार संघात 26 हजार मतांनी आघाडी मारली आहे. त्यामूळे दिवे-केचे यांच्या आशा वाढल्या आहेत. या मतदारसंघात कुणबी, भोयर पवार, आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यावरुन सध्या भाजपकडे भोयर पवार, तेली समाजाचे जवळीक वाढली आहे. त्यात सध्या असलेले आमदार अमर काळे यानी सध्या आपली बाजू सापीत ठेवण्यासाठी चुपी साधली आहे. 

केचे- दिवे यांच्या वादात आपल्याला संधी मिळणार असल्याचे स्वप्न आमदार पाहत आहे. येत्या विधनसभा  निवडणुकीत भाजप पक्षात कोणाला उमेदवारी मिळणार हे येणारा वेळ ठरवेल. या मतदारसंघात कॉंग्रेस व भाजप पक्षात सरळसरळ लढत पहायला मिळाणार आहे. मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार दादाराव केचे यांचा तीन हजार मताने पराभूत झाला. 

यावेळी देशात भाजपचा बोलबाला असताना पराभूत व्हावे लागले. त्यामूळे या निवडणुकीत याना उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यानी आपल्या आर्वी येथील सभेच्या भाषणात दादराव केचे यांची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वास दिले आहे. त्यामूळे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री या दोघात आर्वी मतदार संघाच्या उमेदवारीवरुन खडाजंगी होणार काय?

       
आमदार अमर काळे यांच्या पाच वर्ष नेतृत्वात कोणतेही कामे झाले नसल्याने भाजप पक्षाने या मतदार संघात कामे केल्याचा दावा सांगण्यात येते. मोठमोठ्या जाहिरात, भूमिपूजन करुन दाखवण्याचा प्रयत्न माजी आमदार करताना दिसत आहे. आमदार अमर काळे यानी लोकांच्या मताचा आदर न करता फक्त खेळ समजून घेण्याचा दिसत आहे. आमदार अमर काळे यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवारांना निवडणुकीत पडण्याचा काम केले असल्याने अनेकांना पराभव पत्करावा लागला.  

कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जास्त निवडूण येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. त्यामूळे कॉंग्रेस पक्ष नेत्याची नाराजी पहायला मिळत आहे. अनेक नेते कॉंग्रेस पक्षाला रामराम करुन भाजपत प्रवेश घेऊन पद भुषवित आहे. कारंजा तालुक्यात सर्वाधीक मोठा समाज असलेल्या मतदार अनेकदा प्रतिनिधित्व दिले नसल्याने हा समाज नाराजी सुर काढत आहे. सध्या या समजला भाजप पक्षाने नेतृत्व दिल्याने आमदाराला याचा धक्का देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News