रणबीर कपूरचा डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कलाकाराचे निधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 July 2020

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा डुप्लीकेट म्हणून ओळख असलेल्या जुनैद शहाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने काश्‍मीर-श्रीनगर येथे निधन झाले.

मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा डुप्लीकेट म्हणून ओळख असलेल्या जुनैद शहाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने काश्‍मीर-श्रीनगर येथे निधन झाले. तो केवळ 28 वर्षांचा होता. जुनैद रणबीरचा डुप्लीकेट असल्याने काश्‍मीर तसेच आसपासच्या परिसरात प्रचंड लोकप्रिय होता.

जुनैदच्या शेजारी रहात असलेल्या युसुफ जमील यांनी ट्‌विट करीत जुनैदच्या निधनाची बातमी दिली. खुद्द ऋषी कपूर यांनी जेव्हा जुनैदचे फोटो पाहिले तेव्हा त्यांनादेखील मोठे आश्‍चर्य वाटले होते. ऋषी कपूर यांनी जुनैदबद्दल दोनदा ट्‌विटही केले होते. त्यामुळे जुनैदची ख्याती हळूहळू काश्‍मीरमध्ये पसरली. जुनैद मॉडेलिंग करीत होता आणि त्याला ऍक्‍टिंगची आवड होती. अनुपम खेर यांच्या ऍक्‍टिंग स्कूलमध्ये त्याने प्रवेशही घेतला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याचे त्याचे स्वप्न होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News