कला म्हणजे जीवन

- राजश्री बिनायकिया
Saturday, 18 May 2019

आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपण स्वतः करायचा असतो. आपला आनंद आपणच मिळवायचा असतो. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नये.

आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपण स्वतः करायचा असतो. आपला आनंद आपणच मिळवायचा असतो. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नये. पण या सर्व गोष्टींसाठी जोड हवी ती सातत्याचे प्रयत्न आणि प्रोत्साहनाची आणि ते मिळण्याचे उत्तम उगम स्थान म्हणजेच आपली कला.निसर्गाने हे कलागुण प्रत्येकालाच दिलेले आहेत, पण अनेक कारणांनी नको त्या गोष्टीच्या मागे पळत आपण आपल्यातील कलागुणांना दाबून टाकतो.

त्या कलांना जोपासणे, त्यांना वाव देणे, प्राधान्य देणे हे आपल्याच हातात असते. खरा आनंद आपल्यातील कला जोपासण्यातच असून, तो आनंद काही पैशातून किंवा कुणाच्या अनुकरणाने मिळत नाही. आज प्रत्येक गोष्टीत कला आहे. ट्रेकिंग ड्रायव्हिंग, शिवणकाम, हस्तकला, भरतकाम, पाककला, संवाद कौशल्य, लेखन, नृत्य, विविध वस्तूंचा संग्रह करणे, वाचन, गायन, संगीत ऐकणे इत्यादी सर्व कलाच आहेत. जीवनासाठी कला आणि कलेसाठी जीवन.

म्हणूनच मैत्रिणींनो, आजच सर्वांनी संकल्प करा, की मी माझ्या कलागुणांना वाव देणार, कला जोपासणार, त्या आत्मसात करणार. कारण हे छंद व कलाच आपल्याला आत्मिक समाधान व निखळ आनंद देतात. या कलांमधून आपण व्यवसायाची निर्मितीही करू शकतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News