ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणाऱ्या विराटला अटक करा ; चेन्नईतील वकिलाची उच्च न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • जाहिरातींचे सर्वाधिक ब्रॅंड असलेला विराट कोहली ऑनलाईन गेमिंगची करत असलेल्या जाहिरातीमुळे अडचणीत आला आहे.
  • गेमिंग हा भारतात गुन्हा आहे.

नवी दिल्ली :- जाहिरातींचे सर्वाधिक ब्रॅंड असलेला विराट कोहली ऑनलाईन गेमिंगची करत असलेल्या जाहिरातीमुळे अडचणीत आला आहे. गेमिंग हा भारतात गुन्हा आहे. त्यामुळे अशा वेबसाईटचे प्रमोशन केल्यामुळे विराट कोहलीला अटक करावी, अशी याचिका चेन्नईतील सूर्यप्रकाशन या वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात केली आहे.

गेमिंग हा आपल्या देशात गुन्हा आहेच, त्याने सर्वस्व गमावल्यामुळे तमिळनाडूत आत्महत्येची प्रकरणे वाढलेली आहेत. गेमिंगला प्रोत्साहन दिल्यामुळे विराट कोहलीला लगेचच अटक करावी, अशी मागणी या याचिकाकर्त्या वकिलाने केली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ऑनलाईन गेमिंगचे आपण आहारी गेलो होतो, त्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, अशी नोट लिहून चेन्नईत एका १९ वर्षांच्या युवकाने नुकतीच आत्महत्या केली होती. हे उदाहरण या याचिकाकर्त्या वकिलाने दिले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News