अत्यावश्‍यक कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय मुंबईत करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020
  • महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली मागणी

नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतून अत्यावश्‍यक सेवेसाठी मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची धास्ती नवी मुंबई महापालिकेने घेतली आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. महापौर जयवंत सुतार यांनी मुंबईत जाणाऱ्या परिचारिका, डॉक्‍टर, पोलिस, बॅंक अधिकारी, महापालिका कर्मचारी अशा व्यक्तींची राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने त्या शहरात करावी, अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मार्चपासून नवी मुंबईत 145 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी बहुतांश हे मुंबईत नोकरी करतात. त्यामध्ये डॉक्‍टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, वॉर्डबॉय, बॅंक अधिकारी अशा कर्मचाऱ्यांचा समवेश आहे. त्यांच्यापासून नवी मुंबईतील तब्बल 55 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबईत आयटी उद्योगात काम करणारे 15 रुग्ण, मुंबईत विविध वाहनचालकांमधून झालेले 11 रुग्ण नवी मुंबईत सापडले आहेत. मुंबईत ये-जा करीत असल्यामुळे काही नागरिकांना कोरोनाची लागण होऊन त्यांच्यामार्फत नवी मुंबई शहरात कोरोनावाहकांची साखळी निर्माण झाली आहे. कोरोनावाहकांच्या साखळीमुळे एकाच घरातील 14 ते 15 रुग्ण सापडले आहेत.

नवी मुंबई हे मुंबईच्या शेजारचे शहर असल्यामुळे या शहरातून अत्यवश्‍यक सेवेसाठी कामाला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच हे सर्व कर्मचारी अत्यावश्‍यक सेवेतील असल्यामुळे त्यांचे कामावर जाणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या प्रकाराची दखल पालिकेने घेतली आहे. आयुक्त मिसाळ यांनीही नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास मुंबईत जाणारे अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी कारण इरल्याचे मत व्यक्त केले आहे. महापौर सुतार यांनी नवी मुंबईतून मुंबईत जाणाऱ्या अत्यावश्‍यक सेवेतील कमचाऱ्यांची वास्तव्याची सोय मुंबई महापालिकेने करावी अशी माणगी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नवी मुंबईत सापडणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश कोरोना वाहकांची साखळी मुंबईतून आलेल्या नागरिकांमुळेच निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा कोरोनाबाधितांची संख्या थांबवण्यासाठी ही मागणी करण्यात येत आहे.
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News