२०० वर्षापुर्वीचे १० भव्य वाडे असलेले गाव!

अॅड. राजेंद्र गलांडे, सातारा
Tuesday, 26 February 2019

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एकाच गावातील १० भव्य वाडे असलेले गावं. इतिहास, जूने वाडे व त्याची वास्तूरचना यामधे ज्यांना रस आहे त्यांनी एकदा तरी या गावाला भेट द्यायलाच हवी. साधारणपणे २७ एकर परीसरात मुख्य तटबंदीच्या आत एक मुख्य वाडा व त्यालगत ९ वाडे अशी ही रचना. आजही तटबंदी व आतिल वाड्यांचे मुख्य दरवाजे त्यावेळची या वाड्यांची भव्यता लगेच लक्षात आणून देतात. १७७१ नंतर कुशाजी निंबाळकर यांच्या काळात ही बांधकामे झाली आहेत. कुशाजी निंबाळकर यांचा काळ थोरले माधवराव पेशव्यांच्या समकक्ष आहे. ही बाब लक्षात घेता हे वाडे २०० वर्षापुर्वीचे आहेत. 

फलटणच्या निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष निंबराज यांचा सन १२२१ साली मृत्यू झाला पुढे त्याच घराण्यातील मालोजीचा सन १५७० च्या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांचे म्हाकोजी व अर्जोजी या दोन पुत्रांपैकी म्हाकोजी व त्यानंतरचे त्यांचे वंशज हे वाठार गावचे इनामी वतन, शेर्‍या, देशमुखी यांचा उपभोग घेत राहिले. या काळात फलटणच्या घराण्याशी संघर्ष सुरु होता व त्याचा परिणाम म्हणून कुशाजीला गाव सोडून जावे लागले होते पण थोरल्या माधवराव पेशव्यांनी अभय दिल्यावर कुशाजी यांनी स्वत:ची व वाठारची प्रगती केली. 

चांगला व इतका द्रव्यसंचय केला की, पेशव्यांना व इतर मराठा सरदारांना कर्ज देऊ लागले. याच कुशाजींनी मूळ वाठार गावालगत ओढ्याच्या इशान्येस नवीन वाठार २७ एकरास पूर्ण तटबंदी करुन वसवले व त्यात १ मुख्य व त्यालगत ९ भव्य वाडे बांधले.
 
सातारा जिल्ह्यात रहात असूनही मी यावर्षीचा फेब्रुवारी महिना मला वाठार गाव पहायला उजडावा लागला. बरोबर १ फेब्रुवारीला फलटण कोर्टात एक अंतिम युक्तिवाद होता व दुपारी २ च्या सुट्टीपूर्वी काम उरकल्यावर वाठार बघायाचे तात्काळ निश्चित केले अन लगेच निघालो. गाव फलटणपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे लगेच १५ मिनिटात २.३० च्या सुमारास पोहोचलो पण त्यानंतर अंधार होईपर्यंत कसा वेळ गेला ते कळलेच नाही. 

जुन्या वाड्यांची भव्यता नजरेत भरतेचं पण १० पैकी ‍एका वाड्याची जितेंद्र निंबाळकर व त्यांच्या मुलांनी यातील एका वाड्याची मूळ पाया व रचना कायम ठेवून अतिशय सुंदर नुतनीकरण केलेय! तेही पाहण्यासाठी सकाळी काही वेळासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत त्यांनी उपलब्ध केलेय. तेही ज्यांना वास्तू रचनेत रस आहे त्यांनी पहायला हवी अशी बाब आहे. जितेंद्र निंबाळकर यांनी स्वत: या कामाची तसेच मुख्या वाड्याच्या चाललेल्या कामांची माहिती दिली. 

या वाड्यांमध्येही दोन एकाच प्रकारच्या रचनेची व सभामंडप असणारी मंदिरे आहेत. त्यापैकी फलटण वाड्याजवळ जसे राम मंदिर आहे तसेच राम मंदिर व १ विठ्ठल मंदिर आहे. दोन्ही मंदिरांचा लाकडी सभामंडप अन त्यावरील कडीपाट अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत. विहिरी, आड पाण्याच्या सुविधा आजही  चांगल्या अवस्थेत दिसून येत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News