सैनिकांचा valentine day...

अमित पवार, जावळी, जि. सातारा
Saturday, 16 February 2019

या देशाच्या शूर विरांनो
एकच सांगतो आपणाला
धन्य धन्य ती माऊली जिने
जन्म दिला तुम्हाला

प्रेम व्यक्त करायचा दिवस... 
छान गेला असेल ना सगळ्यांचा...
पण आजच एक खुप दुर्दैवी दुःखद घटना घडली
पुलवामा येथे झालेला हल्ला...
बर्‍याच जणांना समजल Status पण ठेवले
आणि भावपूर्ण श्रद्धांजली दिली...
पण खरंच एवढ्या status ने आणि श्रध्दांजलीने
होऊ का हो? आपण त्यांच्या ऋणातून उतराई...
बघा ना, आपण valentine Day साजरा करण्यात
व्यस्त होतो...
तेंव्हा आपले जवान आईचं
रक्षण करण्यात व्यस्त होते...
आपण आपल्या प्रेयसीला भेटायला कपडे
घालून-नटून तयार होत होतो, 
तेंव्हा ते वर्दी घालून लढायला तयार होत होते... 
आपण भेटण्याची जागा ठरवत होतो आणि तिकडे
आपले जवान मृत्यूला आव्हान द्यायला योजना
आखत होते... 
आपण तिच्या डोळ्यात पाहत
गोड स्वप्न पहात होतो, तेंव्हा ते शत्रूच्या डोळ्यात
धूळ फेकत गोळ्या झेलत होते...
बघता बघता आपण प्रेयसीला कवटाळल
आणि तिकडे माझ्या वाघांची मृत्यूला कवटाळ...
किती किती निःशब्द होतंय ना...
आपण आज आपली प्रेयसी आली नाही
भेटली नाही किंवा ती हो बोली नाही
म्हणून दुःखी झालोय मूड off झालाय...
पण आज त्या हल्ल्यात शहीद झालेल्या
घरच्यांच काय... 
त्यामध्ये एखाद्या बाहुली ने
तिचा लाडका बाबा गमावला असेल...
माऊलीने तिचा पुत्र गमावला असेल...
आपल्या पतीची वाट बघत एखाद्या
ताई ने तिचा जीवन साथी गमावला असेल...
आणि एका पित्याने आपला काळजाचा तुकडा
गमावला असेल...
खरंच या शूर विरांच धाडस शौर्य
आणि बलिदान हा संपूर्ण देश कधीच विसरणार
नाही...
माफ करा या देशाच्या शूर विरांनो 
पण आम्ही तुमच्या ऋणातून कधीच उतराई
होऊ शकत नाही...
तुमच्या साहसाला, धाडसाला, शौर्याला 
आणि अपार देशभक्तीला मानाचा मुजरा....
ही भारतमाता सुरक्षित असेल 
तर तुमच्या सारख्या वाघांच्या जिवावर....
खरंच या प्रेमळ दिनी आज हा सारा देश
निशब्द झालाय... फक्त निशब्द...

अमित पवार, जावळी (जि. सातारा)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News