अर्जुन कपूरचे समाजकार्य...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 September 2019
  • अर्जुनने त्याच्या चित्रीकरणामधून थोडा वेळ सामाजिक कार्यासाठी दिला आहे. 
  • अर्जुनने कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर संवाद साधत त्यांच्याबरोबर धमाल-मस्ती केली.​

बॉलीवूडमधील बरेच कलाकार आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढत समाजकार्य करत असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर. अर्जुनने त्याच्या चित्रीकरणामधून थोडा वेळ सामाजिक कार्यासाठी दिला आहे. कर्करोग्यांसाठी काम करणाऱ्या ‘कॅन्सर पेशंट्‌स एड्‌स असोसिएशन’ या संस्थेने वांद्रे येथे नुकताच ‘राष्ट्रीय कर्करोग रोज डे’निमित्त कार्यक्रम घेतला.

यात अर्जुनने कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर संवाद साधत त्यांच्याबरोबर धमाल-मस्ती केली. अर्जुन म्हणतो, ‘कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि कॅन्सरबाबत जनजागृतीसाठी मी वेळात वेळ काढून काहीपण करायला तयार आहे. समाजातील इतर लोकांनीही या मुलांना मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News