अर्जुन कपूरचे सध्याचे अस्तित्व हे सलमानमुळेच - बोनी कपूर 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Thursday, 20 February 2020

.माझ्या कुटुंबाशी सलमानचा पूर्वीसारखा ऋणानुबंध जरी नसला तरी त्याचे माझ्या मुलावर असलेले उपकार मी नेहमीच लक्षात ठेवीन असेही त्याने मत मांडले   

मुंबई : अर्जुन कपूर हा बॉलिवूडच्या वर्तुळात सतत चर्चेत असणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.अर्जुन कपूर हा सध्या मात्र चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.या वेळेस मात्र अर्जुन कपूरचे नाव हे सलमान खानसोबत जोडलं गेल्यामुळे अर्जुनचे नाव हे सिनेवर्तुळात चांगलेच चर्चेत आहे.

बोनी कपूरला आपला मुलगा अर्जुन कपूर हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत अपेक्षित होता मात्र सलमान खान ने अर्जुन कपूरमधील योग्य ते गुण हेरून त्याला दिग्दर्शनाऐवजी अभिनय क्षेत्रात करिअर करायचा सल्ला दिला. वेळोवेळी सलमान खान याने अर्जुन कपूरला स्वतःच्या घरी बोलावून अभिनयाचे धडे देखील दिले. सलमान कडून एकेकाळी अभिनयाचे ऊत्तम असे मार्गदर्शन मिळवणाऱ्या अर्जुन कपूरला सध्या तरी सलमानकडे अपेक्षित असा वाव नाही हे मात्र नक्की.

या दोघांचेही पूर्वीसारखे चांगले संबंध राहिले नसल्याचे स्वतः बोनी कपूर यांनी स्पष्ट केले. बोनी कपूर याचे दिग्दर्शन असलेल्या " वॉन्टेड " आणि  " नो एंट्री " या चित्रपटामध्ये काम केलेल्या  सलमान खान आणि बोनी कपूर या दोघांनी उत्तम असे संबंध आत्तापर्यंत टिकवून ठेवले होते मात्र आता त्या संबंधामध्ये पूर्वीइतका गोडवा राहिला नसल्याचे नुकतेच बोनी कपूर यांनी स्पष्ट केले.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांच्या बहुचर्चित रिलेशनशिपमुळे या सर्व  
संबंधाला एकप्रकारे तडाच गेला आहे अशा आशयाचे मत देखील त्याने स्पष्ट केले.माझ्या कुटुंबाशी सलमानचा पूर्वीसारखा ऋणानुबंध जरी नसला तरी त्याचे माझ्या मुलावर असलेले उपकार मी नेहमीच लक्षात ठेवीन असेही त्याने मत मांडले   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News