सुपारी व नारळाच्या झाडांना वाढीव दराने मिळणार विशेष मदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

चक्रीवादळामुळे पूर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रतिझाडाप्रमाणे वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे पूर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रतिझाडाप्रमाणे वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांपैकी सुपारी व नारळाच्या झाडांना प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपये या दराने मदत देण्याऐवजी पूर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना प्रतिझाडप्रमाणे खालील दराने मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सुपारी - रु. 50/- संपूर्ण नष्ट झालेल्या प्रतिझाडासाठी नारळ - रु. 250/- संपूर्ण नष्ट झालेल्या प्रतिझाडासाठी वरील दराने मदत देण्यासाठी होणारा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News